श्रीलंकेचा पराभव करत भारतीय महिला संघाने 7 व्यांदा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२


बांगलादेश मधील सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर झालेल्या महिलांच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेचा पराभव करुन विजेतेपद मिळवले. भारताने ही लढत ८ विकेटनी जिंकली आहे.

स्मृतीने २५ चेंडूत ५१ धावांची खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहचवले. रेणुका सिंगने ३ षटकात ३ गडी बाद केले तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर अष्टपैलू कामगिरीसाठी दीप्ती शर्माला मालिकाविराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

आशिया कप जिंकण्याची भारताची ही सातवी वेळ आहे. आतापर्यंत ८ वेळी ही स्पर्धा झाली आहे. २००४ साली भारताने प्रथम विजेतेपद मिळवले होते. तेव्हापासून २०१६ पर्यंत सलग सहा विजेतेपद टीम इंडियाने मिळवली होती. २०१८ मध्ये अंतिम सामन्यात भारताचा बांगलादेशने पराभव केला होता. आता पुन्हा एकदा श्रीलंकेचा पराभव करून भारताने आशिया कप जिंकला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *