डॉ. श्रीकांत देशमुख यांची  करिअर कट्टा उपक्रमाच्या विभागीय समन्वयक पदी निवड

मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी
२४ जानेवारी २०२२

ओझर


महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करियर कट्टा या उपक्रमाच्या पुणे विभागीय समन्वयक ( उच्च शिक्षण) पदी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आनंदराव पवार महाविद्यालय पिरांगुट येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.श्रीकांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. श्रीकांत देशमुख यांनी २०२०-२०२१ या कालावधीत पुणे जिल्हा समन्वयक म्हणून कार्य केले. या कार्यकाळात डॉ.देशमुख यांनी विविध उपक्रमांची अंमलबजावणी यशस्वीरित्या केली यात जागर करिअर कट्टा, संविधानाच्या पारायणाचे सिंहावलोकन व उद्योजक आपल्या भेटीला, IAS आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांची उद्योजकता विकास केंद्र व कौशल्य विकास केंद्र निवडीसाठी चे त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय होते.

शैक्षणिक वर्ष २०२२ – २०२३ या वर्षासाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता विभागाने पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांचा विभाग नेमून यासाठी विभागीय समन्वयक म्हणून डॉ. श्रीकांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मा. राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा. ॲड. संदीप कदम साहेब, खजिनदार मा.ॲड.मोहनराव देशमुख साहेब, उपसचिव मा.एल. एम.पवार साहेब,  सहसचिव मा. ए.एम.जाधव साहेब व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शर्मीला चौधरी, उपप्राचार्य डॉ. महेंद्रा अवघडे, उपप्राचार्य डॉ.प्रवीण चोळके आणि महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले.