उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचल्या – देवेंद्र फडणवीस

२९ नोव्हेंबर २०२२


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या विरोधात रोखठोक पत्रकार परिषद घेतली. यावेळी उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा भावूक चेहरा कॅमेऱ्यातही कैद झालेला बघायला मिळाला. उदयनराजे यांच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, उदयनराजे यांच्या पाठीशी आम्ही कायम आहोत. छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाही. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. शेवटी राज्यपाल हे पद संवैधानिक पद असतं. ते सरकारच्या हाती नसतं. सरकार त्यात काही करु शकत नाही. राज्यपालांवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार राष्ट्रपतींचे असतात. त्यामुळे मला असं वाटतं की, उदयन महाराज हे समजून घेतील. पण त्यांच्या भावनेच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठं प्रेरणास्त्रोत दुसरं कोणी असूच शकत नाही. आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्त्रोत तेच आहेत. महाराष्ट्र आणि देशाचे आदर्श तेच आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *