आण्यात सरदार पटेल हायस्कूलमध्ये १४० विद्यार्थ्यांचे लसीकरण

रामदास सांगळे
विभागीय संपादक
२२ जानेवारी २०२२

बेल्हे


सरदार पटेल हायस्कूल आणे (ता.जुन्नर) येथे इयत्ता ९ वी व १० वी च्या १४० मुलामुलींना कोरोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस दिला. अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक धोंडिभाऊ शिंदे यांनी दिली. या लसीकरणासाठी बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फड, व त्यांचा स्टाफ तसेच अंगणवाडी सेविकांनी सहकार्य केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल बेलकर, उपाध्यक्ष बाळासाहेब दाते, संजय आहेर, आरिफ इनामदार, योगेश आहेर, अण्णा खैरे आदी ग्रामस्त उपस्थित होते. या वेळी डॉ.शिवाजी फड यांनी विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्व पटवून सांगितले व लस घेतल्यावर कोणती काळजी घ्यावी त्या बद्दल माहिती दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *