मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०६ ऑक्टोबर २०२२


शिवसेनेतील बंडखोरीनंतर झालेल्या या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह शिवसेना आणि महाविकासआघाडीवर सडकून टीका केली आहे.

बाळासाहेबांचे विचार तोडून, मोडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आमदारांनी विरोध केला, मी त्यांना सांगितलं, मला काही नको. पण, छातीवर दगड ठेऊन मी त्यांच्यासोबत राहिलो. तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती, मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला. नारायण राणे बोलले, बाळासाहेब ठाकरे असते हा मुख्यमंत्री झाला नसता. तुमची लायकी तुम्ही काढताय, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

बाळासाहेब ठाकरे रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला. तुम्ही त्यांच्या तालावर नाचू लागला आणि आम्हालाही नाचवायला लागलात, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *