आळेफाटा पोलिसांनी केले पत्रकारांना सन्मानित

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
०८ जानेवारी २०२२

आळेफाटा 


पत्रकार दिनानिमित्त आळेफाटा पोलिस ठाण्याच्यावतीने पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो जुन्नर तालुक्यात पत्रकार दिन साजरा करण्यात आला आळेफाटा पोलिस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून आळेफाटा पोलिस ठाण्यात पत्रकारदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल बडगुजर यांनी प्रास्ताविक करुन उपस्थित पत्रकारांचे स्वागत केले त्यानंतर पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सर्व उपस्थित पत्रकार मित्रांचा सन्मान केला.

यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी या पत्रकारीतेचा पाया रचला असल्याचे सांगितले तर पत्रकारांच्या वतीने समाजदर्पणचे संपादक सचिन डेरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणचा अंक प्रकाशित करावयाचा होता त्यावेळी त्यांनी त्यांच्या पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेऊन अंक प्रकाशित केला बाळशास्त्री जांभेकर यांनी अत्यंत अडचणीच्या काळात पत्रकारिता केली तशीच पत्रकारिता आजचे पत्रकार करत असल्याचे सांगितले यावेळी रवींद्र भोर यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार सुरेश भुजबळ रवींद्र कोल्हे,जयवंत शिरतर,रायचंद शिंदे ,गोकुळ कुरकुटे, विजय चाळक,सचिन डेरे,नितिन शेळके राजेश कणसे,अमर भागवत अशोक डेरे, कैलास बोडके सुभाष डोके, विकास गडगे गोपीनाथ शिंदे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल बडगुजर यांनी प्रस्थाविक करताना सांगितलं की पत्रकार आणि पोलीस यांचा कुठेही सन्मान होत नसतो तर सुत्रसंचालन जयवंत शिरतर यांनी केले व आभार पोलिस उपनिरिक्षक रघुनाथ शिंदे यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *