ग्रामोन्नती मंडळाच्या श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०८ जानेवारी २०२२

नारायणगांव


महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद यांच्यावतीने आयोजित केलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. तालुक्‍यात इयत्ता आठवी मधील मृदुला मंगेश मेहेर या विद्यार्थिनीने तालुका गुणवत्ता यादीत प्रथम तसेच जिल्हा यादीमध्ये तृतीय तर राज्य पातळीवर २२ वा क्रमांक मिळविला. राज्य स्तरावर गुणवत्ता यादीत येण्याचा मान तसेच सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळवण्याचा मान श्री अनंतराव कुलकर्णी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविला. अशी माहिती मुख्याध्यापिका अनघा जोशी यांनी दिली.

गुणवत्ता यादीमध्ये आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये मृदुला मंगेश मेहेर २२ वा क्रमांक, इयत्ता पाचवी चे विद्यार्थी स्वराज अमोल जाधव, मेहेत्रे यश संतोष, ढवळे आदिती संतोष, रोकडे वरद दत्तात्रेय, इयत्ता आठवी मेहेर मृदुला मंगेश, भराडिया वेदिका योगेश, जाधव शिव सुनील, खांडे सृष्टी आत्माराम, खरमाळे प्रथमेश सुनील, फुलसुंदर यश श्रीकांत, खाजेकर आदेश शितल, मुलानी अमानत अंवर, तोडकर पार्थ महेंद्र, यादव वैष्णव किसन, व्यवहारे अनुजा अरुण, माळवतकर सिद्धी अभिजीत, भराडिया राधिका योगेश, गुळवे कार्तिक सदानंद, गाढवे संयुक्ता महेश, पोखरणा दिव्य आनंद, माळी हर्षल शिवाजी, फुलसुंदर श्रवण सुनील यख विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षिका सीमा कुलकर्णी, विलास टेंभेकर, आरती पवार, प्रिया कामत, प्रतिक्षा शिरसाट, प्रतिक्षा पवार, वैशाली पुंडे, रंजना पिल्ले, सचिन टेंभेकर, राजश्री चिंतामणी यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामोन्नती मंडळाच्या अध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *