कृष्णप्रकाश यांची मुदत पुर्व बदली राजकीय हेतूने – रिपब्लिकन युवा मोर्चा

भानुदास हिवराळे
बातमी प्रतिनिधी
२१ एप्रिल २०२२

पिंपरी


पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची मुदतपुर्व बदली ही चुकीची व अन्यायकारक असून, ती केवळ आगामी महानगर पालिका निवडणूका विचारात घेवून करण्यात आलेली आहे. त्यामुळे रिपब्लिकन युर्वा मोर्चा , कष्टकरी पंचायत , भिमशाही युवा संघटनेच्या वतीने लेखी विनंती रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेकडे केली आहे. अशी माहिती डंबाळे यांनी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

गुरुवारी पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेस कष्टकरी कामगार पंचायतीच्या चे नेते बाबा कांबळे, भिमशाही युवा संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर उबाळे तसेच रफिक कुरेशी, राहुल ओव्हाळ आदी उपस्थित होते.

यावेळी डंबाळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस आयुक्त पदाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील संघटीत गुन्हेगारी तसेच अवैद्य धंदे आणि लँड माफीया यांचेवर कायदेशीर कारवाई करून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत आजपर्यंत त्यांनी दहा हजार पेक्षा जास्त नागरिकांची समक्ष भेट घेवून त्यांच्या तक्रारी सोडविण्याचा विक्रमही केलेला आहे. त्यामुळे ते पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे अत्यंत आदरणीय अधिकारी ठरले.

शहरातील कायद्या सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांवर जबर कारवाई करीत असतानाच सर्व सामान्य नागरिक व स्वंयसेवी संस्थाच्या समाजाभिमुक कार्यक्रमांना प्रत्यक्ष हजेरी लावत त्यांनी सोशल पोलीसींगचा सुयोग्य वापर करीत पोलीस व नागरिक यांचे मधील कटुता कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नागरिकांसाठी त्यांचा खाजगी मोबाईल नंबर २४ तास उपलब्ध करून दिला होता व त्याद्वारे समस्यांचे निराकरण करीत होते.

विशेषत: महिला वर्गामध्ये त्यांचेमुळे सुरक्षीततेची भावना निर्माण झाली होती.

संघटीत गुन्हेगारी संपविण्यासाठी आतापर्यंत त्यांच्या कालावधीत तब्बल ५० पेक्षा अधिक गुन्हेगारी टोळयांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. आयुक्तालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोक्का, एम.पी.डी.ए., तसेच तडीपारी सारख्या कठोर प्रतिबंधात्मक कारवाई पहिल्यांदाच मोठया प्रमाणात कोणत्याही दबावाला न जुमानता करण्यात आलेल्या आहेत.

तसेच कृष्णप्रकाश यांनी झोपडपट्टीतील मुलांना विशेषतः विधी संघर्षित बाल गुन्हेगार यांना गुन्हेगारी क्षेत्रातून प्ररावृत्त करून त्यांचे योग्य पुर्नवसनासाठी प्रकल्प तयार केला आहे. त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये सन्मानाची व आपुलकीची भावना वाढत असतानाच शहरातील राजकीय नेते मात्र त्यांचेबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसलेले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कोणत्याही क्षणी होणारी निवडणूक लक्षात घेवून पोलीस आयुक्तांच्या निपक्ष: कारवाईचा आपल्याला फटाका बसू नये म्हणून कृष्ण प्रकाश यांची पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त पदावरून मुदतपुर्व बदली करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड मधील नागरिकांचे जनमत हे कृष्ण प्रकाश यांची बदली रद्द होण्याच्या बाजूचे असून, सरकारने त्याचा सन्मान करीत कृष्णप्रकाश यांना पोलीस आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवडचा आयुक्त पदाचा निर्धारित कालावधी पुर्ण होईपर्यंत त्यांची बदली करू नये अशी विनंती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा राज्य सरकारकडे करीत आहोत असे डंबाळे यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *