चिपळूण येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय टेनिस बॉल स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या मुलींच्या संघाने पटकावला चषक

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२२ डिसेंबर २०२१

पिंपरी 


महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट आणि रत्नागिरी टेनिस बॉल क्रिकेट यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित 19 वर्षाखालील 21 वी राज्यस्तरीय स्पर्धेत पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक आणि मुलांचे संघाने तृतीय क्रमांक मिळवला आहे .
महाराष्ट्रातील मुलींच्या 8 संघानी व मुलांच्या 32 संघानी या राज्य स्पर्धेत भाग घेतला होता. मुलींच्या संघातून अमिषा पाटील , अनुजा मोरे , ह्यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली आहे . संचिता सोनावणे , श्रद्धा आव्हाड , साक्षी महाजन , दिव्या दारवटकर ह्यांनी छान गोलंदाजी केली तसेच अपूर्वा काजळे,कार्तिकी बोंबले ,गायत्री टिंगरे ,श्रिया पांडे ह्यांनी चांगले क्षेत्ररक्षण केले.

सामनावीरचा मान हा अनुजा मोरेला मिळाला . पिंपरी चिंचवड मुलींच्या संघाने रत्नागिरी , अमरावती जिल्हा , कोल्हापूर , धुळे या सर्व जिल्हांवर मात करून अजिंक्यपद प्राप्त केले आहे. या सर्व स्पर्धा 16 डिसेंबर 2021 ते 19 डिसेंबर 2021 रोजी शरदचंद्र पवार कृषी विद्यालय ,चिपळूण , रत्नागिरी येथे संपन्न झाल्या .या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षिका पार्वती बाकळे, स्मिता गांगुर्डे ह्यांचे मार्गदर्शन लाभले .व सफिया शेख हिने व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेटचे सचिव डॉ मृदुला महाजन मॅडम आणि अध्यक्ष अनिल दाहोत्रे सर , सुनीता फडके , ऐश्वर्या साठे व सर्व पदाधिकारी ह्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *