अहमदनगर शहर व पाथर्डी येथे विक्री करण्याचे उद्देशाने चार गावठी कट्टे व सहा जिवंत काडतूसे कब्जात बाळगणारे चार सराईत आरोपी जेरबंद

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
९ डिसेंबर २०२१

अहमदनगर


अहमदनगर जिल्ह्यात गावठी कट्टे बाळगणारे व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, तसेच अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, यांना जिल्ह्यातील गुन्हेगारांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते. वरील सुचनेप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात गावठी कट्टे बाळगणारे व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेत त्यांच्यावर कारवाई करण्याकामी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमले होते. सदर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार मन्सुर शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, भाऊसाहेब कुरुंद, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, पोलीस नाईक शंकर चौधरी, देवेंद्र शेलार, रविकिरण सोनटक्के, दिपक शिंदे, लक्ष्मण खोकले, पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरुट, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, रविंद्र घुगांसे, सागर ससाणे, रणजित जाधव, रोहित येमुल, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत गावडे, असे अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवैध गावठी कट्टे बाळगणारे व विक्री करणारे आरोपींचा शोध घेत होते . त्यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशनचे हद्दीत, पाथर्डी येथील जुने बस स्टॅण्डजवळ, एक इसम गावठी कट्टा विक्री करण्याचे उद्देशाने संशयीतरित्या फिरत असताना आढळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव १) छोट्या ऊर्फ सोहेल राजु पठाण, वय २२, रा. मेहेरबाबा टेकडी, ता. पाथर्डी, जी. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यास अधिक विश्वासात घेऊन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे, असे एकुण २५,६००/ – रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने, त्यास ताब्यात घेवुन पाथर्डी पोलीस स्टेशन गु.र.नं. ९३३ / २०२१, आर्म अॅक्ट ३ / २५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.

 १,०६,८००/- रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत

तसेच, तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, तपोवन रोड येथील सागर चिकन शॉपचे शेजारी एक इसम गावठीकट्टा विक्री करण्याचे उद्देशाने संशयीतरित्या उभा असताना आढळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता, त्याने त्याचे नाव १) मनोज लक्ष्मण झगरे, वय ३०, रा. गुंडू गोडावुन पाठीमागे, तपोवन, अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्यास अधिक विश्वासात घेवुन , पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे, असे एकुण २५,६००/ – रु. किंमतीचे मुद्देमाल मिळुन आल्याने, त्यास ताब्यात घेवुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. १०५५/२०२१, आर्म अॅक्ट ३ / २५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

तसेच कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये, एमएसईबी ऑफिस जवळ, राजश्री हॉटेल समोर, नगरकॉलेजच्या कम्पाऊंडच्या बाजुला, कोठी, अहमदनगर येथे, दोन इसम गावठी कट्टा विक्री करण्याचे उद्देशाने संशयीतरित्या फिरत असताना आढळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव, गाव विचारले असता, त्यांनी त्यांची नावे :
१) गणेश अरुण घोरपडे, वय ३५, रा. सिध्दार्थ नगर, अहमदनगर, व
२) राहुल श्रीरंग आडागळे, वय ३०, रा. सिध्दार्थनगर, अहमदनगर असे असल्याचे सांगितले.
त्यांना अधिक विश्वासात घेवुन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचे अंगझडतीमध्ये दोन देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे, असे एकुण ५५,६००/ – रु. किंमतीचे मुद्देमाल मिळुन आल्याने, त्या दोघांना ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं. ९०५/२०२१, आर्म अॅक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे. वरील प्रमाणे कोतवाली पोलीस स्टेशन, तोफखाना पोलीस स्टेशन व पाथर्डी पोलीस स्टेशनचे हद्दीत, एकुण चार आरोपी, चार गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसांसह, एकुण १,०६,८००/- रु. किंमतीचे मुद्देमालासह विक्री करण्याच्या उद्देशाने मिळुन आले आहेत. सदरची कारवाई ही, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *