नळवणे येथील श्री कुलस्वामी खंडेराय चंपाषष्ठी महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रम

रामदास सांगळे
विभागीय संपादक
३ डिसेंबर २०२१

बेल्हे


जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील महाराष्ट्राचे कुलदैवत समजल्या जाणाऱ्या श्री कुलस्वामी खंडेरायाच्या श्री क्षेत्र नळवणे (ता.जुन्नर) गडावर गुरुवार (दि.९) रोजी चंपाषष्ठी महोत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.तसेच श्री कुलस्वामी खंडोबा मंदिर जीर्णोद्धार व सुवर्ण कलशारोहन पंधरावा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्ताने गडावर सकाळ पासून विविध गडावर विविध कार्यक्रम असणार आहे. यामध्ये पहाटे ४ वा श्री मंगलस्नान व महाभिषेक अभिषेक सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत पालखी मिरवणूक सोहळा व महाआरती, ११ नंतर श्री ला नेवेद्य व आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता कुलस्वामी खंडेरायाचे जागरण. रात्री ७ ते ९ हभप जालिंदर महाराज दराडे यांचे हरिकीर्तन होईल. रात्री १० नंतर शोभेची दारू उडवण्याचा कार्यक्रम असेल.अशी माहिती श्री कुलस्वामी खंडेराया देवस्थान चे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी दिली.तसेच करोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील गगे यांनी केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *