नवी सांगवी येथे किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार

११ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


रागाने का बघतोस , यावरून झालेल्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले . ही घटना मंगळवारी दि . ८ सायंकाळी सातच्या सुमारास विनायकनगर , नवी सांगवी येथे घडली . प्रणित लक्ष्मण जाधव २३ , रा . काटेपुरम चौक , नवी सांगवी असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे . त्यांनी बुधवारी दि . ९ सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास फिर्यादी प्रणित हा विनायकनगर नवी सांगवी येथील ओंकार पोळी भाजी केंद्र समोर त्याचा मित्र ओंकार घोगरे याच्याशी बोलत होता . त्या वेळी फिर्यादीच्या ओळखीचा मुलगा पीयूष शेळके हा फिर्यादी प्रणित याच्याकडे रागाने बघत होता . त्यामुळे फिर्यादी प्रणित याने रागाने का बघतोस , अशी विचारणा केली.

आरोपी पीयूष याने ‘ तू मला विचारणारा कोण , माझ्या नादी लागला असता तुला खल्लास करून टाकेल ‘ असे म्हणत कमरेच्या मागील बाजूस लपविलेला कोयता बाहेर काढून फिर्यादी प्रणित याच्यावर खुनी हल्ला केला . पीयूष विजय शेळके २० , रा . विनायकनगर , नवी सांगवी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे .


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *