लखीमपुर शहिद किसान कलश  यात्रेचे, शिरुर शहरात स्वागत

रवींद्र खुडे
विभागीय संपादक,शिरूर
१५ नोव्हेंबर २०२१

शिरूर

उत्तर प्रदेश मधील लखीमपुर – खेरी येथे झालेल्या हिंसाचारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांचा, अस्थिकलशाला अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने, महाराष्ट्रभर  जनजागृती यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात्रेत शेतीमाल विक्री कायदा २०२०, कंत्राटी शेती कायदा २०२०, अत्यावश्यक वस्तू कायदा २०२०, या विरोधात शेतकरी का लढत आहेत याबद्दल जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी आणि या आंदोलनात ११ महिन्यात विविध घटनात शहीद झालेल्या ६३१ शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण करण्याच्या हेतूने, शहीद किसान संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

शिरूर शहरात असणाऱ्या हुतात्मा स्मारकावर, शेतकरी आंदोलनात शहिद झालेल्या शेतकऱ्यांना, श्रध्दांजली वाहून अभिवादन करण्यात आले

दिनांक ६ नोव्हेंबर पासून, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड नामदेव गावडे, यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथुन सुरू झालेली ही यात्रा सातारा, सांगली, पुणे मार्गे, १३ नोव्हेंबर २०२१ रोजी  अहमदनगर जिल्ह्याकडे रवाना झाली. त्यावेळी शिरूर येथे, या शहिद शेतकऱ्यांच्या अस्थीकलशाला अभिवादन करण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे  राज्य सहसचिव कॉंम्रेड सुभाष लांडे, भाकप महाराष्ट्र राज्य सचिव मंडळ सदस्य कॉंम्रेड स्मिता पानसरे, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य अ. भा. किसान सभेचे कॉम्रेड बन्सी सातपुते, कॉ. शांताराम वाळुंज, कॉ. सुधीर टोकेकर, कॉ. भारती न्यालपेल्ली, आदी पदाधिकारी सहभागी झाल्याचे कॉम्रेड संतोष खोडदे यानी सांगितले. शिरुर येथील अभिवादन कार्यक्रमास मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, शिरुर प्रवासी संघटनेचे अनिल बांडे, शेतकरी नेते नितीन थोरात, संदिप कडेकर, रवी लेंडे, ॲड. स्वप्निल माळवे, रमेश सांगळे, बंडु दुधाणे, नाथाभाऊ पाचर्णे, फिरोज सय्यद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *