महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रकारे जनजागृती मोहीम

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ नोव्हेंबर २०२१

पिंपरी-चिंचवड 


भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार पुनरिक्षण मोहीम राबविण्यात येत असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रकारे मतदार जनजागृती करण्यात येत आहे. पुणे सायक्लोथाॅन मोहिम पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात आलेली होती. त्याचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक सुनिल शेट्टी उपस्थित होते. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे देखील उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रकारे जनजागृती मोहीम
महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रकारे जनजागृती मोहीम

या सायक्लोथाॅन कार्यक्रमात तीन हजाराहून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते. त्यात महाविद्यालयीन युवक-युवतींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. त्याचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुक विभागाचे नोडल अधिकारी अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती करण्यात आली. १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मतदार नोंदणी व पुनरिक्षण मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावेत असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *