कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान” यशस्वी

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१८ ऑक्टोबर २०२२

नारायणगाव


ग्रामोन्नती मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामीण रुग्णालय नारायणगाव आणि रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी “माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान” राबविण्यात आले. कार्यक्रमात वैज्ञानिक अधिकारी दत्तात्रय रोकडे यांनी मनोगत व्यक्त करताना अठरा वर्षांपुढील महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी व महिलांनी आरोग्य तपासणी वेळेत करून घेणे गरजेचे आहे. आपली शरीर संपत्ती ही एक अनमोल देणगी आहे. आरोग्य तपासणी मध्ये महिलांचे हिमोग्लोबिन,शुगर,किडनी संबंधित यूरिन तपासणी, थायरॉईड तसेच महिला संदर्भात रुटीन तपासणी याविषयी माहिती दिली. तर ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक संदेश थोरात यांनी देखील दैनंदिन घटकांचा आपल्या मानवी जीवनावर कोणत्या पद्धतीने परिणाम होतो. त्याचप्रमाणे आपला आहार खाण्याच्या सवयी यांमधून काही उद्भवणाऱ्या आजारांविषयी माहिती दिली.


प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ज्योती काळे यांनी महिलांच्या आरोग्य विषयक समस्या या विषयावर मार्गदर्शन करून महिलांना उपयुक्त पडणाऱ्या आरोग्यविषयक काही महत्त्वाच्या बाबी आपल्या मार्गदर्शनातून सर्वांपर्यंत पोहोचवल्या. या अभियानाअंतर्गत महाविद्यालयातील एकूण २०० विद्यार्थिनींनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. या अभियानामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ शर्मिला गायकवाड, बालरोगतज्ञ डॉ प्राची शिरभाते, बोलतज्ञ डॉ अशोक माठे, दंत चिकित्सक डॉ.नेहा गडगे, डॉ. अंजली, आयुष विभागाचे डॉ. मिलिंद घोरपडे व डॉ. अभिजीत काळे, एंटर डॉक्टर मृणाल, सिस्टर इन्चार्ज पाडेकर मॅडम. व ग्रामीण रुग्णालय नारायणगाव यांची सर्व टीम उपस्थित होती.


व्यवसाय प्रशासन प्रमुख प्रा. डॉ. अनुराधा घुमटकर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी व महिलांसाठी असा उपक्रम आयोजित केल्याबद्दल ग्रामीण रुग्णालय नारायणगाव यांच्या सर्व टीमला शुभेच्छा दिल्या. आलेल्या मान्यवरांचे स्वागत व परिचय सन्मान महाविद्यालयाचे आरोग्य अधिकारी प्रा. आकाश कांबळे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.डी.टाकळकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा.डॉ.व्ही.टी.पाटे, प्रा.डॉ.ए.ए.जगदाळे, प्रा.डॉ. एस.ए.जगदाळे, प्रा.एस.बी. खरात, प्रा.पी.एस.साने, पवित्रता भालेराव प्रा.मयूर मोरे,यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वैशाली मोढवे यांनी केले तर आभार डॉ. मधुरा काळभोर यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *