पिंपरी चिंचवड मनपा सेवकांच्या पतसंस्थेला जिल्हयात प्रथम क्रमांकाची मानाची ढाल

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२५ ऑक्टोबर २०२१

पिंपरी- चिंचवड


पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेला जिल्हयात उत्कृष्ट काम करणारी पगारदार सहकारी पतसंस्था म्हणून या वर्षीची प्रथम क्रमांकाची मानाची ढाल पीडीसीसी बॅंकेचे चेअरमन रमेश आप्पा थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.पुण्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात सोमवारी (दि. 25 ऑक्टोबर) झालेल्या कार्यक्रमात थोरात यांच्या हस्ते संस्थेचे मार्गदर्शक (तज्ञ संचालक) अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुडे यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी पीडीसीसी बँकेचे संचालक मदनराव देवकाते व सुरेश अण्णा घुले यांच्या हस्ते व बँकेचे अधिकारीव मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सरव्यवस्थापक विजयराव टापरे, उपसरव्यवस्थापक सुधीर पाटोळे, सहा. सरव्यवस्थापक अभिजीत हेगडे व कर्ज अधिक्षक बिगरशेती विभाग अंकूश हिंगे आणि पतसंस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय ढगे, खजिनदार महादेव बोत्रे आणि संचालक महाद्रंग वाघेरे, मनोज माछरे, संजय कुटे, दिलीप गुंजाळ, नथा मातेरे, संचालिका चारुशिला जोशी, माजी संचालक आबा गोरे आदी उपस्थित होते.

आतापर्यंत दोन वेळा हा पुरस्कार मिळविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेला जिल्हयातील उत्कृष्ट काम करणारी पगारदार सहकारी पतसंस्था म्हणून एकमेव संस्था आहे. यापुर्वीही सन २००६-२००७ साली जिल्हयात उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रथम क्रमांकाचा पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कायमस्वरुपी ढाल प्रधान करून गौरविण्यात आले होते. संस्थेने गेली १५ वर्ष शशिकांत उर्फ बबन झिजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली विनम्र आणि तत्पर सेवा व पारदर्शक व्यवहार व्यवस्थित रित्या चालविला आहे. संस्थेची ३१ मार्च २०२१ ची आर्थिक स्थिती पाहता संस्थेने सभासदांच्या ठेवीवर जास्तीत जास्त ९% व्याज देवून सभासदांना कमीत कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करीत आहे. या पतसंस्थेची १५ वर्षापूर्वी वार्षिक उलाढाल रु.१७ कोटीच्या आसपास होती. आता १५ वर्षात संस्थेची वार्षिक उलाढाल रु.२०० कोटींच्या जवळपास आहे. कर्ज मर्यादा रु. ५० हजाराहून रु. १५ लाखापर्यंत वाढविली आहे. कर्ज थकबाकी ०.००१% इतकी आहे. संस्थेला सतत ‘अ’ वर्ग दर्जा मिळालेला आहे.

संस्था स्थापनेपासून सलग ५० वर्ष सभासदांना जास्तीत जास्त १४% लाभांश वाटप करीत आहे. संस्थेच्या सलग २५ वर्ष सभासद व सेवानिवृत्त सभासदांना बक्षिस म्हणून रुपये ५०००/- वाटप करीत आहे. तसेच संस्थेच्या मयत सभासदांचे कर्ज माफ करणारी महाराष्ट्रातील पहिली पतसंस्था आहे. संस्थेची ३१ मार्च २०२१ अखेर आर्थिक स्थिती एकूण भाग भांडवल रु.५२ कोटी, सभासद ठेवी रु.२६ कोटी सभासद कर्ज वाटप रु.१४४ कोटी व बँकेतील गुंतवणूकी रु.२४ कोटी व बँक उचल रक्कम रु.४१ कोटी (देणे) इतकी आहे. शशिकांत ऊर्फ बबन झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक मंडळाच्या व सभासदांच्या एकजुटीने संस्थेला प्रगती पथावर ठेवण्याचे काम करीत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *