बी. डी. काळे महाविद्यालयात सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु…

आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
घोडेगाव : येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी. डी. काळे महाविद्यालय व महाराणा प्रताप करिअर अकॕडमी, मंचर यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात नुकतेच  सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण  केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या करिअर अकॅडमीचे उदघाट्न घोडेगाव पोलीस  स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.लहू थाटे साहेब यांचे शुभहस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री.दिलीप मेदगे साहेब हे होते.

उदघाट्न प्रसंगी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.अजित काळे, उपाध्यक्ष श्री. तुकाराम काळे, कार्याध्यक्ष श्री.सुरेशशेठ काळे,सचिव अॕड. मुकुंदराव काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर, समन्वय समितीचे चेअरमन श्री.संतोष भास्कर, एम.सी. व्ही.सी.चे चेअरमन श्री.शिवदास काळे, पंचायत समितीचे माजी सभापती श्री.कैलासबुवा काळे, संचालक श्री.सोमनाथ काळे,प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव,प्राचार्य डॉ. पांडुरंग मुळूक,ज.वि.मंदिरचे प्राचार्य मोहिनी खेडकर,न्यू इंग्लिश मेडियमच्या प्राचार्य मेरिफ्लोरा डिसुझा,माजी प्राचार्य श्री.भगवान माळवे,संस्थेचे पदाधिकारी, संचालक, सल्लागार, केंद्र समन्वयक प्रा. भाऊसाहेब थोरात,अधिक्षक श्री.अशोक काळे,तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते. याप्रसंगी करिअर अकॅडमीचे प्रमुख संचालक प्रा. गणेश शिंदे यांनी अकॅडमीची संपूर्ण  माहिती उपस्थितांना करून दिली.

Advertise

या करिअर अकॅडमी मध्ये सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, सैन्य व  पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, शारीरिक क्षमता चाचणी, बौद्धिक चाचणी व लेखी परीक्षा अशी सर्व प्रकारची तयारी करुन घेतली जाणार आहे. या केंद्रासाठी मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून अकादमीचे प्रमुख प्रा. गणेश शिंदे तसेच त्यांचे सहकारी प्रा.विक्रांत पडवळ प्रा.सुप्रिया शिंदे, प्रा.आरती पडवळ व प्रा. सुनील निघोट हे  काम पाहणार आहेत.

One thought on “बी. डी. काळे महाविद्यालयात सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरु…

  • July 2, 2021 at 2:17 pm
    Permalink

    API Lahu Thate is a very good officer and a great human being. Ghodegaon is a lucky town to have such a dimond in it’s crown.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *