सी. ए. परीक्षेत पुणे विभागात प्रथम आलेल्या ऋतुजा घोलपचा सत्कार

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
२५ ऑक्टोबर २०२१

घोडेगाव


द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या सी. ए. इंटरमिजेट (नवीन अभ्यासक्रम) परीक्षेत भारतात टॉप ५० मध्ये पुणे विभागातून प्रथम आलेल्या ऋतुजा घोलप हिचा मेडल, ट्रॉफी व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष समीर लड्डा, उपाध्यक्ष काशिनाथ पठारे, माजी अध्यक्ष अभिषेक धामणे, एस. बी. झावरे,.अमृता कुलकर्णी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.नोव्हेंबर २०१९ मध्ये द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेल्या सी. ए. फाउंडेशन परीक्षेत देखील ऋतुजाने ४०० पैकी ३४६ गुण मिळवून टॉप ५० मध्ये भारतात १८ वा क्रमांक मिळविलेला होता.

नोव्हेंबर २०२० मधील सी. ए. इंटरमिजेट (नवीन अभ्यासक्रम) परीक्षेत ८०० पैकी ६१८ गुण मिळवून भारतात ५० वा व पुणे विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. फुलवडे ता. आंबेगाव येथील अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक अविनाश घोलप यांची ती कन्या होय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *