घोडेगाव येथील वृत्तपत्र विक्रेत्याने वृत्तपत्र सोबत स्वखर्चाने केले परिसरातील ग्राहकांना मास्क वाटप…

घोडेगाव : – मोसीन काठेवाडी,आंबेगाव ब्युरोचिफ

सध्या कोरोना संसर्ग दिवसे- दिवस वाढत आहे याच पाश्वभुमीवर खबरदारी म्हणून घोडेगाव ( ता. आंबेगाव ) येथील वृत्तपत्र विक्रेते निलेश चिलेकर यांनी परिसरातील वाचकांना कोरोनापासुन संरक्षणासाठी स्वखर्चाने मास्क वाटप करून कोरोना विषयक जनजागृतीचे पत्रक देवुन एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याने या अनोख्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

येथील विठ्ठल चिलेकर हे गेल्या ७० वर्षाहून अधिककाळ वृत्तपत्रविक्रेता म्हणून व्यवसाय करत असून त्यांचे वय आता ९० वर्षे झाले आहे. त्यांनी अशीच सामाजिक बांधिलकी जपली आता त्यांचा हा व्यवसाय त्यांचा नातू निलेश चिलेकर गेले ७ वर्षापासून उतंमरित्या चालवत आहे


या कोरोना काळातही घरोघरी पेपर देण्याचे काम ते करीत असून सामाजिक भावनेतुन १ हजार वृत्तपत्र ग्राहकांना त्यांनी मास्कचे वाटप केले
निलेश चिलेकर हे आदर्श कामगिरी बजावत आहे. इतर लोकांना त्यांचे अनुकरण करावे असे यावेळी घोडेगावचे लोकनियुक्त सरपंच क्रांती गाढवे , उपसरपंच सोमनाथ काळे , माजी उपसरपंच सुनील इंदोरे म्हणाले.