शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांना मारण्याच्या धमकी पत्राच्या निषेधार्थ, सणसवाडी येथे सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१९ ऑक्टोबर २०२१

सणसवाडी


“बिनकामाचे कुत्र्याने हतीवर भुंकु नये व माकडाने सुर्यावर थुंकू नये. अशानं थोबाड फुटेल नाहीतर भाजून काळं होईल” अशी जळजळीत प्रतिक्रिया, मौजे सणसवाडी ता. शिरूर, जी. पुणे, येथे सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व महिलांनी व्यक्त केली. शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांना, दोन दिवसांपूर्वी एक निनावी धमकी पत्र आले असून, त्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. काही वर्षांपूर्वी, शिरूर नगर परिषदेचे तत्कालीन नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची भर दिवसा व भर बाजारपेठेत हत्या झालेली होती. याच हत्येचे उदाहरण देत, आमदाराचाही महेंद्र मल्लाव होईल अशी धमकी या निनावी पत्रात दिल्याने, शिरूर शहर तसेच संपूर्ण तालुक्याचे वातावरण ढवळून निघालेले आहे. या पत्रात केवळ आमदार अशोक पवार यांनाच धमकी दिलेली नसून, त्यांच्यासह शिरूर नगरपरिषदेचे सभागृहनेते व प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशशेठ रसिकलाल धारिवाल, तसेच शिरूरच्या अनेक नगरसेवक व आमदार अशोक पवार तसेच प्रकाशशेठ धारिवाल, यांच्या जवळच्या अनेक कार्यकर्त्यांच्या नावांचा उल्लेख असलेले हे निनावी पत्र आहे. विशेष म्हणजे हे पत्र थेट दुसऱ्या जिल्ह्यातून म्हणजेच नगर जिल्हयातून टपालात टाकलेले आहे. या पत्रात असलेली भाषा ही गावंढळ असून, शिरूर शहर व शहरातील अनेकांना यात लक्ष केलेले असल्याने, शहरात एकच खळबळ उडालेली आहे.

अशा प्रकारचा हा दुसरा लेटर बॉम्ब असून, अलीकडेच कोव्हिड काळात शिरूर शहरातील तरुणांनी रुग्णांना मोफत ऑक्सिजन पुरवठा केलेला होता. हा मोफत ऑक्सिजन पुरवठा, उद्योजक प्रकाशशेठ धारिवाल यांच्या व इतर काहींच्या सहकार्यातून करण्यात आलेला होता. हा ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्यांनाही, अशाच प्रकारे नगर जिल्ह्यातून निनावी पत्र आलेली होती. परंतु त्यावेळी त्या पत्राचा इतका गाजावाजा झालेला नव्हता. परंतु आता हे दुसरे निनावी पत्र आलेले असून, मजकूर, आशय, भाषाशैली एकाच स्वरूपाची असल्याने, व थेट विद्यमान आमदारांनाच धमकीचे पत्र आल्याने, या घटनेची गंभीरता वाढलेली असून, सर्वच स्तरातून या धमकीवजा पत्राचा जाहीरपणे निषेध होत असून, या गगटनेची दखल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनीही घेतलेली आहे.शिरूर शहर व तालुक्यासह, हवेलीतील अनेक गावांमधून, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते जाहीर निषेध व्यक्त करत प्रशासनाला निवेदन देत आहेत. अशीच एक निषेधाची सभा सणसवाडी येथेही, सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजीत करण्यात आलेली होती. यावेळी काही वेळ रास्तारोकोही करण्यात आले. शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना यावेळी आंदोलन कर्त्यांनी, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून निवेदन दिले. यावेळी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांना मारण्याच्या धमकी पत्राच्या निषेधार्थ, सणसवाडी येथे सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

यावेळी कॉंग्रेसचे नेते महेशबापु ढमढेरे, तालुकाध्यक्ष वैभव यादव, शिवसेना पुणे जि. उपाध्यक्ष अनिल काशिद, तालुका प्रमुख अमोल हरगुडे, शाखा प्रमुख सोमनाथ शेळके, भाऊसाहेब हरगुडे, जि. प. सदस्या कुसुम धैर्यशील मांढरे, शिरूर पं. स. सभापती मोनिका नवनाथ हरगुडे, शिरूर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडीतआप्पा दरेकर, सरपंच सुनंदा दरेकर, माजी सरपंच दता हरगुडे, सुरेश हरगुडे, वर्षा कानडे, शिवाजी दरेकर, शशीकला सातपुते, साहेबराव भंडारे, माजी चेअरमन पांडुरंग हरगुडे, सुहास दरेकर, बबुशा दरेकर, शरद दरेकर, उपसरपंच ऍड. विजयराज दरेकर, नवनाथ हरगुडे, ग्रा. पं. सदस्य सागर दरेकर, रामदास दरेकर, दतात्रय हरगुडे, मारूती दरेकर, रामभाऊ दरेकर, सुनिता दरेकर, स्नेहल भुजबळ, सुनिता दरेकर, अमोल हरगुडे, नवनाथ शिवले, हरीष येवले, योगेश शितोळे, सुनिल भोसुरे, वाडा पुनर्वसनचे उपसरपंच नायकोडी तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होता .आमदार अशोक पवार यांच्या कामांचा कुणाला हेवा वाटत असल्याने, असले निच कृत्य निनावी पत्र लिहिणाऱ्याने केल्याचे उपस्थितांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. त्यात, कांग्रेसचे महेश ढमढेरे, शिवसेनेचे अनिल काशिद , राष्ट्रवादीच्या कुसुम मांढरे, मोनिका हरगुडे, पंडीत दरेकर, दता हरगुडे, सागर दरेकर, राजेंद्र नरवडे आदींनी आपल्या भाषणात जाहीर निषेध केला.यावेळी सणसवाडी व परीसरातील दरेकरवाडी, धानोरे, वढु, आपटी, पिंपळे, शिक्रापुर, तळेगाव, कोरेगाव, वाडा, पेरणे अशा अनेक गावांमधून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *