मंचर – भोसरी PMPL सेवेचा शुभारंभ

सदानंद शेवाळे
मंचर प्रतिनिधी
१६ ऑक्टोबर २०२१

मंचर


मंचर – भोसरी या PMPL सेवेचा शनिवार पासून शुभारंभ झाला

मंचर – भोसरी या PMPL सेवेचा शनिवार पासून शुभारंभ झाला. या सेवेच्या शुभारंभ प्रसंगी भोसरीहून आलेल्या PMPL बस चे जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात, वेणूताई खरमाळे, शहानुर शेख,कविता थोरात यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तसेच भीमाशंकर सह. साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांच्या हस्ते PMPL चे व्यवस्थापक झेंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात यांच्या हस्ते बसच्या वाहक शेटे मॅडम यांचा ही सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस मंचर चे शहराध्यक्ष सुहास बाणखेले यांनी PMPL चे आभार मानून सदर सेवेमूळे चाकण तसेच भोसरी, पुणे येथे कामाला जाणाऱ्यांचा फायदा होणार असल्याचे सांगितले तसेच PMPL चे व्यवस्थापक श्री. झेंडे यांनी प्रवाश्यांचा प्रतिसाद भेटल्यास बस ची संख्या वाढवण्यात येईल असे आश्वासन आपले मनोगत व्यक्त करताना दिले.

जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात, वेणूताई खरमाळे, शहानुर शेख,कविता थोरात यांच्या हस्ते पूजन करण्यात आले

याप्रसंगी उपस्थित असलेले भीमाशंकर सह. साखर कारखान्याचे चेअरमन श्री. बाळासाहेब बेंडे यांनी सदर बस चालू करण्यासाठी शहराध्यक्ष सुहास बाणखेले, जिल्हा परिषद सदस्य सौ. तुलसी भोर, निलेश शेळके यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगून या बस सेवेमुळे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच शैक्षणिक कोर्ससाठी पुण्याला रोज ये-जा करावी लागते त्यांना फायदा होणार असल्याचे सांगून चाकण किंवा भोसरी MIDC तील कामगार वर्गालाही ही PMPL ची बस सेवा उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी चे सचिन बाणखेले, प्रवीण मोरडे, राजेंद्र थोरात, संतोष गावडे,निलेश शेळके, बाजीराव मोरडे, कैलास गांजाळे,सुरेश निघोट, गणेश मोरडे व मंचर चे नागरिक उपस्थित होते. अंकित जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Pujan was performed by Zilla Parishad members Aruna Thorat, Venutai Kharmale, Shahanur Sheikh, Kavita Thorat.
जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात, वेणूताई खरमाळे, शहानुर शेख,कविता थोरात यांच्या हस्ते पूजन करण्यात आले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *