डिंगोरे येथे अवैद्य दारू विक्रेत्यांवर ओतूर पोलिसांची कारवाई

अहमदनगर कल्याण महामार्गावर असलेल्या डिंगोरे गावानजीक असलेल्या शिवशाही हॉटेल वर आज पर्यंत अनेक वेळा अवैद्य दारू विक्री बाबत कारवाई झाली आहे,परंतु वारंवार कारवाही होऊन सुद्धा आरोपी बाळू नायकोडी हा शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून पुन्हा पुन्हा सदर ठिकाणी दारू व्यवसाय सुरू करत आहे, आज शनिवार दि 17 रोजी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून डिंगोरे येथील हॉटेल शिवशाही येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी अनेक देशी व विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या,मिळालेला मुद्देमाल स्थानिक पंचांच्या उपस्थितीत ताब्यात घेऊन पंचनामा केला,
पुढील तपास ओतूर पोलीस सरेशन चे प्रभारी अधिकारी श्री परशुराम कांबळे करत आहेत.

Ootor police crack down on illegal liquor vendors in Dingore
डिंगोरे येथे अवैद्य दारू विक्रेत्यांवर ओतूर पोलिसांची कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *