जुन्नर तालुक्यातील अमरापुर शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला वनविभागाच्या देवराईत प्रात्यक्षिक शिक्षणाचा आनंद

पवन गाडेकर
निवासी संपादक
११ ऑक्टोबर २०२१

जुन्नर

कोरोना मुळे ऑनलाईन शिक्षणाला कंटाळलेल्या विद्यार्थ्याची ४ ऑक्टोबर पासून इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या नंतर शाळेतील मुलांना भयमुक्त वातावरण व आनंदीदायी शिक्षण वाटावे व मुलांनी शाळेत रमावे म्हणून जुन्नरमधील वनसप्ताहानिमित्त वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे तसेच वनपरिमंडळ अधिकारी मनीषा काळे व वनरक्षक कल्याणी पोटवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली बुद्रुक येथील वनविभागाच्या देवराईत विद्यार्थ्यांनी बियांची लागवड करून प्रात्यक्षिक शिक्षणाचा आनंद घेतला. उषा टाकळकर यांनी सदर क्षेत्रभेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना समजावून सांगून विद्यार्थ्यांना वनस्पती, किटक,पक्षी यांचे निरीक्षण करण्यासाठी प्रेरित केले. तर मनीषा काळे यांनी देवराई म्हणजे काय? तसेच विविध वृक्षांची नावे सांगून पर्यावरण रक्षण करण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे हे विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटा प्रमाणे सोप्या भाषेत समजावून सांगितले. घनराईतील विविध वृक्ष दाखवून त्यांची नावे सांगून वनराई व घनराई दोन्ही संकल्पना प्रत्यक्ष समजावून दिल्या घनराईचा उद्देश, सीडबॉलचे महत्व, बीजरोपनासाठी पक्ष्यांची होत असणारी मदत याबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली तर कल्याणी पोटवडे यांनी पर्यावरणाशी तसेच वनराईशी निगडीत विविध घोषवाक्य मुलांकडून म्हणून घेतली व विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून निसर्ग सानिध्यात अनौपचारिक शिक्षणाचा आनंद घेतला तसेच मार्गदर्शनपर चर्चासत्रात निसर्गातील प्राणी, त्यांची अन्नसाखळी, वनस्पतीच्या विविध भागांचे कार्य, वनस्पतीचे विविध उपयोग याबद्दल विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी वनराईतील विविध रानफुले पाहून पाठ्यपुस्तकातील गवतफुला, पोर डोंगरावर भाळली, एक झाड लावू मित्रा अशा विविध कवितांचे गायन केले तर काळे मॅडम यांनी त्यांच्या आवाजात विद्यार्थ्यांसमोर महाराष्ट्रगीत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,सादर केले.दसरा सणाच्या निमित्त कांचनवृक्ष व आपट्याच्या झाडांचे नुकसान होऊ नये म्हणून या दिवशी आम्ही या झाडाची पाने न तोडता या झाडांची वृक्षलागवड करू अशी प्रतिज्ञाही विद्यार्थ्यांनी केली तसेच समाजातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश देण्याचा निश्चय केला वनराईतील वृक्षांना इजा न पोचवता तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर ठेवून वनभोजनाचा आनंद ही विद्यार्थ्यांनी घेतला. सदर कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती, वनविभाग जुन्नर, पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभाग यांचे सहकार्य लाभले. मुलांना केलेल्या अनमोल मार्गदर्शनाप्रित्यर्थ मुख्याध्यापिका विनिता शिंदे यांनी आभार मानले. सदर क्षेत्रभेटीसाठी सरिता भालचिम ,सविता जोशी, लिलाबाई नेहरकर, श्रीपत नेहरकर यांचेही सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *