झाडांचे खिळे काढणाऱ्या, झाडांना सन्मान देणाऱ्या महिलांचा सन्मान….

पिंपरी-चिंचवड
09/03/2021

अंघोळीची गोळी संस्था गेली ३ वर्षे पिंपरी चिंचवड शहरात झाडांवर ठोकलेले खिळे आणि अनधिकृत जाहिराती काढत आहेत. संस्थेमार्फत महिला दिनानिमित्त पर्यावरणाचा संस्कार जपणाऱ्या,झाडांचे खिळे काढणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.


यावेळी पिंपरी चिंचवड शहर समन्वयक प्राजक्ता रुद्रवार म्हणाल्या की येत्या काळात झाडांचे खिळे काढण्यासाठी प्रशासनाचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच ज्यांनी झाडांवर अनधिकृतपणे जाहिराती केल्या आहेत त्यांच्यावर ‘विद्रुपीकरण कायदा १९९५’ आणि ‘ वृक्ष कायदा १९७५ ‘ नुसार पोलीस कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे करणार आहे.


यावेळी संस्थेचे आधारस्तंभ आनंद पानसे म्हणले की प्रत्येक महिला आपल्या दिवसाची सुरवात तुळशीला पाणी घालून करते आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देते . खिळे मुक्त झाडे या मोहिमेत महिलांचा वाढता सहभाग ‘ बोले तैसा चाले , त्याची वंदावी पाऊले ‘या म्हणीचा प्रत्यय देतात .
यावेळी संस्थेकडून ‘खिळे मुक्त झाडं’ या मोहिमेच्या सैनिक नगरसेविका शर्मिला बाबर , केतकी नायडू , रचना गुप्ता , रुपाली मगदूम , मृणाल मगदूम आणि वनिता सावंत यांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी महिलांनी पुढाकार घेउन प्राधिकरणातील सेक्टर २७ मधील २५ झाडांना खिळे मुक्त , जाहिराती मुक्त केले.
यावेळी राजेंद्र बाबर , सूर्यकांत मुथियान , सचिन काळभोर ,निलेश बंगाळे, राहुल धनवे आणि माधव पाटील उपस्तिथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *