तासगावच्या वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ अभियान

राजू थोरात
बातमी प्रतिनिधी
७ ऑक्टोबर २०२१

तासगाव

विद्यार्थ्यांनी जबाबदारीचे भान ठेवावे – प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे

विद्यार्थ्यांनी प्रलोभनांपासून दूर राहावे शिस्तीला बाधा येईल असे वर्तन करू नये जबाबदारीचे भान ठेवावे असे उद्गार प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे अकरावी विद्यार्थी स्वागत समारंभात बोलताना काढले. ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील अभ्यासपूरक उपक्रमात सहभागी होऊन सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व.

घडविण्याचा प्रयत्न करावा महाविद्यालयातील प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देतात तुम्हाला येणाऱ्या अडचणी महाविद्यालयातील प्राध्यापकांना सांगून त्याचे निराकरण करावे अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे त्यांनी गुलाबपुष्प देवून स्वागत केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर विभागप्रमुख प्रा. आर.डब्ल्यू.रोमन यांनी केले तर आभार प्राध्यापक.डी.व्ही. पाटील यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आण्णासाहेब बागल यांनी केले.कार्यक्रमाला .के.एस. गायकवाड ,सौ.एस.बी. वनमोरे ,सौ.एस.बी. पाटील, .रणजीत पाटील ,सुशांत झांबरे ह्या शिक्षकासह अकरावी वर्गातील विद्यार्थी कोरोना नियमांचे पालन करून मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही दृश्य आमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी राजू थोरात यांनी पाठवली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *