मेडीकल गॅस पाईपलाईन निविदा रद्द करा, ‘शुभम ईपीसी’सह सल्लागाराला काळ्या यादी टाका-सत्ताधारी भाजपा नगरसेवक तुषार कामठे…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

एल-1 कंपनीकडे ‘चीन’च्या उत्पादित कंपनीचे ‘प्राॅडक्ट’

पिंपरी- दि ३० मार्च २०२१
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्याने बांधलेल्या चार रुग्णालयात मेडीकल गॅस पाईपलाईन बसविणेत येणार आहे. त्याकरिता दुस-यांदा निविदा प्रसिध्द करण्यात आली. परंतू, एल1 आलेल्या ‘शुभम ईपीसी’ ठेकेदाराने जोडलेल्या कागदपत्राच्या मुल्यमापनात गंभीर चूका निर्दशनास आलेल्या आहेत. त्या ठेकेदार कंपनीने इंडस्ट्रीज क्षेत्रात वापरणा-या उत्पादित कंपनीचे ‘प्राॅडक्ट’ वापरत आहेत. शिवाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चीन कंपनीच्या उत्पादित केलेले साहित्य देखील वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही ‘शुभम ईपीसी’ ठेकेदाराने ‘एजीएसएस सिस्टीम’ हे चीनच्या उत्पादित कंपनीचे असल्याचे आढळून आलेले आहे.याकडे संबंधित पालिकेच्या अधिका-यासह सल्लागाराने जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सदरील निविदा रद्द करुन त्या ठेकेदार कंपनीसह सल्लागारास काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी गंभीर तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात नागरिकांच्या जीवावर बेतण्याची दाट शक्यता आहे.
महापालिकेने नवीन भोसरी, जिजामाता, थेरगाव आणि आकुर्डी या चार रुग्णालयात मेडिकल गॅस पाइपलाइन बसविण्यात येणार आहे. त्याकरिता भांडार विभागाने निविदा नोटीस क्रमांक 43/2020-21 जानेवारी महिन्यात 4 जानेवारीला प्रसिद्ध केली होती. 26 कोटी 61 लाख रुपयांच्या या निविदेसाठी सुरुवातीला 5 निविदाकारांनी सहभाग नोंदविला होता. मात्र, कुठलेही कारण न देता तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ही निविदा रद्द केली होती.
त्यानंतर नव्याने सूचना क्रमांक 48/202021 द्वारे 28 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आली. निविदेसाठी 5 फेब्रुवारी ही सात दिवसाची अंतिम मुदत देण्यात आली होती. त्याव