देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत; शिवसेना नेत्याचा दावा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०५ नोव्हेंबर २०२२


राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंद केलं त्यानंतर राज्यात सत्तापालट झाली. त्यानंतर सत्तासंघर्षाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी ठाकरे गटाकडून कोर्टात करण्यात आली. एकीकडे सुनावणी सुरू असताना आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठ दावा केला आहे.

काँग्रेसचे २२ आमदार सरकारमध्ये येण्यासाठी तयार असल्याचा दावा चंद्रकांत खैरेंनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हुशार आहेत. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडेल म्हणून त्यांनी आत्तापासूनच काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. यातून ते त्यांचं मुख्यमंत्रीपद मिळवून घेतील.

निवडणुका कधीही लागू शकतात. राष्ट्रपती राजवटही लागू शकते. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाली तर काय होईल? तुम्हाला माहिती आहे हे राज्यपाल कसं काम करतात. आपले १२ लोक त्यांनी घेतले नाहीत. आपलं कोणतंच काम केलं नाही”, असं खैरे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *