मातोश्री शैक्षणिक संकुल येथे वृक्षारोपण मोहीम

पारनेर प्रतिनिधी
२७\०९\२०२१

आडवाटेचं पारनेरचे कार्य उल्लेखनीय : डॉ. दीपक आहेर

वर्ल्ड फार्मसिस्ट डे चे औचित्य साधून आज मातोश्री शैक्षणिक संकुल , कर्जुले हर्या व टीम आडवाटेचं पारनेर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. मातोश्री आयुर्वेद महाविद्यालय विविध आयुर्वेदिक औषधींनी संपन्न असे सर फादर हरमण बखर उद्यानाचा शुभारंभ करण्यात आला.

टीम आडवाटेचं पारनेरच्या सदस्यांनी आज आयुर्वेदिक महत्व असणारी हिरडा , बहावा , कडुनिंब , नागफणी , लक्ष्मीतरु , लिंबू , मोह , गवती चहा , गुळवेल , आंबा , बकुळ , निरगुडी, आवळा , कोरफड , इ. विविध प्रकारची 200 झाडे लावून उद्याननिर्मितीस प्रारंभ केला. वृक्षलागवडी नंतर उपस्थित मान्यवरांची मनोगते व काव्य मैफिलीचाही कार्यक्रम झाला. यावेळी सर्व मान्यवरांचा गुळवेलाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.
टीम आडवाटेचं पारनेरचे कार्य उल्लेखनीय असून, आडवाटेच्या टीमच्या प्रत्येक उपक्रमाची राज्यभर दखल घेतली जाते. आडवाटेच्या सदस्यांच्या हस्ते सुरु झालेले हे उद्यानही भविष्यात नक्कीच अनेकविध आयुर्वेदिक औषधींनी भरून जाईल व तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण करेल, असे यावेळी बोलताना मातोश्री संकुलाचे कार्याध्यक्ष डॉ. दीपक आहेर यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औषध निर्माण अधिकारी आणि पारनेर साहित्यरत्न स्वातीताई ठुबे होत्या. मातोश्री मीराताई आहेर कॉलेज ऑफ फार्मसी हे आदर्शवत महाविद्यालय असून सर्व गुण संपन्न औषध निर्मन अधिकारी येथे घडतात आशा शब्दात त्यांनी महाविद्यालयाचे कौतुक केल. यावेळी मातोश्री शैक्षणिक संकुलाचे सचिव किरण आहेर, खजिनदार बाळासाहेब उंडे, संस्थेच्या विश्वस्थ डॉ श्वेतांबरी आहेर, प्राचार्य डॉ पवार, डॉ वाकळे , श्री यशवंत फापाळे उपस्थित होते.

तसेच पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, सचिव विनोद गोळे, राज्य मराठी पत्रकार संघाचे संजय मोरे, आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. तसेच टीम आडवाटेचं पारनेरचे अनेक सदस्य उपस्थित होते. यावेळी संकेत ठाणगे यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रा. तुषार ठुबे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *