स्थायी समितीच्या त्या उर्वरित १५ सदस्यांना एसीबीची नोटीस, त्यांची धाकधूक वाढली

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २५ सप्टेंबर २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पहिल्यांदाच एसीबीची धाड पडल्याने एकच खळबळ उडाली होती. स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे लाच प्रकरणाची चर्चा शहरात चांगलीच रंगली होती. शहरातील विरोधी पक्षांबरोबरच पक्षनेते नावदेव ढाके यांनीही झालेल्या प्रकारावर नाराजी वेक्त केली होती.

या सर्व प्रकरणाचा धुराळा खाली बसतो ना बसतो तोच १६ सदस्यांसाठी ही लाच घेतली असल्याची एक ऑडिओ क्लिप एसीबीच्या हाती लागली होती. व न्यायालयात स्पष्टपणे सांगितले होते की ते १६ सदस्य म्हणजे स्थायी समितीचे सदस्य असल्याचे सांगितले होते त्यातील नितीन लांडगे यांना एसीबी ने अटक केली होती म्हणजे उर्वरित १५ स्थायीचे सर्वपक्षीय सदस्य होते. त्यानुसारच परवा स्थायी ची बैठक सुरू असताना एसीबी ची टीम पालिकेत येऊन उर्वरित १५ सदस्यांनाही एसीबी ने नोटीस दिली आहे.

त्यानुसार त्यांना आठ दिवसांत चौकशीला हजर राहण्याचे आदेश आले आहेत. या प्रकरणाने भाजपचे ९ राष्ट्रवादीचे ४ सदस्य, भाजप संलग्न अपक्ष १ आणि उर्वरित शिवसेनेचा १ आशा एकूण १५ सर्वपक्षीय स्थायी समितीच्या सदस्यांना नोटीस मिळाल्याने या सर्व सदस्यांचे धाबे दणाणले आहे. आता पुढे काय होणार याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *