सोबत आले तर बरोबर, नाहीतर तुमच्याशिवाय- खासदार संजय राऊतांचा शिवसेनेचा स्वबळाचा इशारा

रोहित खर्गे

विभागीय संपादक

२६  सप्टेंबर २०२१

भोसरी

भोसरी येथे खासदार संजय राऊत यांनी  शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार भाषण चौफेर बॅटिंग केली. मी बाळासाहेबांच्या बरोबर 30 वर्ष काम केले. बाळासाहेबांनी अनेक नेत्यांना पदावर बसवले. संजय राऊत कोण नाही, जर बाळासाहेबांनी ” शिवसेना ” पाटी लावली नसती तर आपण नसतोच. बाळासाहेबांची सर्वांवर कृपा आहे. त्यांनी  सर्वसामान्यांना पुढे आणले. शिवसेनेची ओळख ही कामातून झाली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भोसरी चा एकही नगरसेवक निवडून आला नाही ही खंत माझ्या मनात आहे. मी नेहमी म्हणत होतो भोसरीतून काम सुरू करायला पाहिजे. मी अगोदरच सांगितले आहे  कोणाचे कितीही नगरसेवक निवडून  आले तरी ” महापौर ” हा आपलाच होणार असल्याचे पुन्हा आजही सांगितले. पिंपरी चिंचवड चा महापौर शिवसेनेचा व्हावा तर चुकले काय. दोन्ही शहरांमध्ये शिवसेनेचा झेंडा आपल्याला फडकवता आला नाही ही खंत त्यांनी वेक्त केली. यापुढे आपण कामाला लागले पाहिजे. राज्याचा मुख्यमंत्री आपला आहे.

” अजितदादा आमचे ऐका, नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीतच आहेत.” असा खोचक टोलाही लगावला. लगेच ब्रेकिंग देऊ  नका असेही मिश्कीलपणे म्हणाले. उद्या आपण अजितदादा बरोबर बसू त्यांना सांगू आमचेही ऐकत जा . सरकार आपले आहे पोलिसांनी आपले  ऐकायला हवे. चारच्या प्रभागचा फटका आपल्याला बसला त्यांना का नाही बसला. आपल्याला फटका बसला याचे कारण आपण कमी पडलो. जनतेपर्यंत पोहचायला कमी पडलो. मुंबईच्या  आपण जवळ आहोत. म्हणजे पिंपरी चिंचवड ला सत्ता यायला हवी.

चंद्रकांत पाटील कोल्हापूर वरून येऊन  कोथरूडला निवडून येऊ शकतात तर आपण या पालिकेवर आपला झेंडा का नाही फडकवू शकत. अशीही खंत वेक्त केली. मुंबईत जसे काम झाले तसे येथे का होत नाही. आघाडी होवो न होवो आपण काळजी न करता सगळ्या जागेवर लढले पाहिजे. आघाडीत बरोबर आले तर बरोबर नाहीतर तुमच्याशिवाय. असेही सांगितले म्हणजे तुम्ही एकटे लढण्याची तयारी ठेव्हा असेच सूचक वक्तव्य राऊतांनी आज भोसरीत केले. आपण सगळ्या जागा लढवायला हव्यात.  स्वाभिमान ठेऊन काम करा.

व्यासपीठावर जेव्हढे नेते बसले आहेत त्यांनी एक एक जरी नगरसेवक निवडून आणला तरी  या पालिकेत सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असेही नेत्यांवर जबादारी टाकत  सुचवले.  राहुल कलाटे व अप्पा बारणे यांनी  मनावर घेतले तर १०- १०  नगरसेवक निवडून आणू शकतात. फक्त त्यांनी मनावर घ्यायला हवे.  म्हणजे पक्षातील गटाटाचे राजकारण बाजूला ठेऊन कामाला लागा असेच सुचवले असावे असे वाटते. महाराष्ट्रात  सत्ता आपली आहे. पद आहे म्हणून नाही तर मनगटात ताकत आहे म्हणून आहे. तुम्ही एकट्याने लढण्याची ताकत ठेव्हा. पिंपरी चिंचवड मध्ये सत्ता आणायची असेल तर भोसरी मध्ये नगरसेवक निवडून यायला हवेत असे पुन्हा एकदा सांगितले.  आज खासदार संजय राऊत यांनी अप्रत्येक्षपणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे सूचित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *