शिक्रापूर पोलीस स्टेशन आयोजित रक्तदान शिबिरात १७० पेक्षा अधिक युनिट रक्त जमा

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१९/०९/२०२१.

शिक्रापूर 

पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून सध्या पुणे जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशन अंतर्गत, रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना रक्ताची कमतरता भासू नये, या उद्देशाने व सामाजिक बांधिलकीतून अशा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

त्या अनुषंगाने रविवार दिनांक १९ सप्टेंबर २०२१ रोजी, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलिस अधीकारी राहुल धस, यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी, शिक्रापूर पोलीस स्टेशन जवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

More than 170 units of blood collected in the blood donation camp organized by Shikrapur Police Station
पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख

त्या अनुषंगाने, सकाळी १०.०० वाजता पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यांनी स्वतः तसेच शिक्रापूर ग्रामपंचायतचे सरपंच रमेश गडदे, या दोघांनी सर्वप्रथम रक्तदान करत सदर रक्तदान शिबिरास सुरुवात केली. त्यानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार, होमगार्ड, पोलीस पाटील, पत्रकार, महिला दक्षता समिती सदस्य, शिक्रापूर ग्रामपंचायतचे अधिकारी व कर्मचारी, प्रिन्सटाऊन सोसायटी सभासद, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, तसेच शिक्रापूर पोलिसांच्या आवाहनानुसार शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमधील विविध सामाजिक संस्था, महिला मंडळ, कॉलेजचे युवक-युवती, तसेच अनेक नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरासाठी पिंपरी चिंचवड ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.

पुणे पोलिसांच्या व विशेषतः पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या स्तुत्य उपक्रमाचे, सर्वत्र जोरदार स्वागत होत असून, कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *