१९६ आंबेगाव विधानसभा मतदार संघात, “उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा” हा कार्यक्रम राबवला तहसीलदार रमा जोशी यांची माहीती

आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
२० सप्टेंबर २०२१

आंबेगाव

१९६ आंबेगाव विधानसभा मतदार संघात गणेशोत्सवानिमित्त “उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा” या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.

“उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा”

मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालयाकडून यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त “उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा” हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सध्या सुरु असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नागरिकांनी मतदार यादीमध्ये त्यांचे नाव नोंदविणे किंवा मतदार यादीमधील त्यांच्या नोंदणीमध्ये दुरुस्ती असल्यास ती करून घेणे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा या उपक्रमाचा हेतु असल्याची माहिती १९६ आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी सारंग कोडलकर यांनी दिली.”उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा” या उपक्रमांतर्गत मतदार नोंदणी वाढविने,मतदानाचे महत्व, नैतिक मतदान या विषयावर स्पर्धांचे आयोजन करन्यात आले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मार्फत मंडपाच्या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याविषयी जनजागृती करणारे बॅनर लावणे, मताधिकार जागृतीविषयाचे व्हिडीओ क्लिप्स,ऑडिओ क्लिप, घोषवाक्ये स्पर्धा , रांगोळी स्पर्धा, कविता गायन स्पर्धा,पोस्टर स्पर्धा,पुणेरी पाट्या, व्यंगचित्र,स्थिर देखावे इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

उपस्थित नवमतदार व नागरिकांना मतदार नोंदणी व मतदानाचे महत्व याविषयी १९६ आंबेगाव स्वीप पथकाचे प्रमुख सुनिल भेके व नारायण गोरे यांचे मार्गदर्शन.

“उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा” या उपक्रमामध्ये निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील स्वराज्य गणेश मंडळाच्या वतीने मंडपाच्या ठिकाणी बॅनर लावून व रांगोळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती करुन स्पर्धेत सहभाग नोंदविला. निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील श्रीराम गणेश मंडळ, कमलजामाता गणेश मंडळ , विठ्ठल-रुख्मिनी मंदिर गणेश मंडळ,श्रीराम गणेश मंडळ रामवाड़ी, श्री साई गणेश मंडळ नांदूर, सार्वजनिक गणेश मंडळ खेडकर मळा अवसरी खुर्द,पिंपळगाव,घोडेगाव,मंचर येथील गणेश मंडळांनी बॅनर लावून मतदार जनजागृती स्पर्धेत सहभाग नोंदविला.यावेळी उपस्थित नवमतदार व नागरिकांना मतदार नोंदणी व मतदानाचे महत्व याविषयी १९६ आंबेगाव स्वीप पथकाचे प्रमुख सुनिल भेके व नारायण गोरे यांनी मार्गदर्शन केले. सचिन तोडकर, विजय घिसे, मंगेश जावळे,विनायक राऊत, काशिनाथ घोंगडे, अभिजीत नाटे, राहुल रहाटाडे,सोपान सैद,संतोष पोखरकर, अशोक लोखंडे,सावकार अरगड़े, संदीप बोंबले,सुरेश रोंगटे,मंडल अधिकारी दिपक मडके सर्व तलाठी,कोतवाल यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.या स्पर्धेत विजेत्या तीन मंडळांचा राष्ट्रीय मतदार दिनी २५ जानेवारी २०२२ रोजी गौरव करण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार लतादेवी वाजे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *