जुनी सांगवीतील विकासकामाबाबत महापौर व आयुक्तांची आढावा भेट

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ सप्टेंबर २०२१

सांगवी

जुनी सांगवी… अतिक्रमण व विकासकामाबाबत अधिका-यांसह पाहणी दौरा

जुनी सांगवी परिसरातील सुरु असलेले रस्त्यांची विकास कामे व प्रस्तावित विकासकामांचा पाहणी दौरा करत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी जुनी सांगवीतील विकासकामांबाबत आढावा भेट दिली. येथील प्रस्तावित मधूबन सोसायटी १२ मीटर डी.पी.रस्ता,मुळा रोड १८ मीटर रस्ता,खेळाचे मैदान, सांस्कृतीक केंद्र,सांगवी बोपोडी पुल,पी.डब्ल्यु.डी.मैदानाशेजारील रस्त्यालगत झालेले अतिक्रमण व विकासकामाबाबत अधिका-यांसह पाहणी दौरा करत आढावा भेट दिली.

यावेळी महापौर उषा ढोरे, “ह” प्रभाग सभापती हर्षल ढोरे, नगरसेविका शारदा सोनवणे, सहआयुक्त विजयकुमार थोरात, उपसंचालक नगररचना विभाग प्रभाकर नाळे, सहशहर अभियंता अशोक भालकर,सहशहर अभियंता श्रीकांत सवणे,सतिश इंगळे, कार्यकारी अभियंता अनिल राउत,प्रमोद ओंबासे,सुनिल वाघुंडे, उद्योजक जवाहर ढोरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *