शहाजी कुतवळ, भरत कुतवळ, प्रकाश कुतवळ, राम कुतवळ, सतीश कुतवळ यांच्या आई सुलोचना किसनराव कुतवळ (वय ८२ वर्ष) यांचे २८ एप्रिल २०२१ रोजी दुःखद निधन झाले होते. त्यांचा दशक्रिया विधी नुकताच संपन्न झाला.
या दशक्रिया विधी निमित्त कुतवळ परिवार आणि ऊर्जा उद्योग समुहाच्या वतीने, रावलक्ष्मी फाउंडेशनला कोव्हिड रुग्णांच्या खर्चासाठी सामाजिक बांधीलकी म्हणून, 1 लाख 11 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
ऊर्जा उद्योगसमूहाचे चेअरमन प्रकाश कुतवळ, मच्छिंद्र ओव्हाळ चीफ अकाऊंटंट ऊर्जा उद्योजक समूह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत, पंडित आप्पा फराटे यांच्या हस्ते शिरूर हवेलीचे आमदार ॲड् अशोक रावसाहेब पवार यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
ऊर्जा उद्योगसमूहाचे चेअरमन प्रकाशशेठ कुतवळ हे नेहमीच सामाजिक कार्याला देणगीच्या स्वरूपात मदत करत असतात.
आज देशावर कोरोनाचे जीवघेणे संकट उभे राहिलेले आहे. आणि अशा या संकटाचा सामना करण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून, शिरूर हवेलीचे आमदार तथा सार्वजनिक उपक्रम समितिचे अध्यक्ष ॲड्. अशोक रावसाहेब पवार, तसेच त्यांच्या पत्नी तथा पुणे जि. प. सदस्या सौ सुजाता अशोक पवार हे दोघेही कोरोना रुग्णांना चांगले उपचार मिळावेत, त्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून शर्थीचे प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. आणि त्यातच राव'लक्ष्मी फाऊंडेशन सुद्धा कोरोना रुग्णांसाठी चांगलं काम करीत आहेत, त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे, असे मत यावेळी पंडित आप्पा फराटे यांनी काढले.
ज्या दनशूरांना या समाजकार्यात आपला वाटा द्यायचा असेल, अशा सर्व दानशूरांनी आपापल्या परीने आपल्या जवळ असणाऱ्या कोव्हिड सेंटरना मदत करण्याचे आवाहन, आपला आवाज न्यूज नेटवर्क कडून तमाम जनतेस करण्यात येत आहे.
आज आपल्या मदतीची व दानाची, काही गरजूंना नक्कीच गरज आहे.
(बातमी – रवींद्र खुडे, विभागीय संपादक, शिरूर)