वडगाव कांदळीत ९१ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण…एका दिवसात ३५० नागरिकांचे लसीकरण…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.31/8/2021

वडगाव कांदळीत ९१ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

एका दिवसात ३५० नागरिकांचे लसीकरण

बातमी:रामदास सांगळे,विभागीय संपादक,जुन्नर

वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील ४५ वरील वयोगटातील ९१ टक्के नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ६९ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.
मंगळवारी (दि.३१) रोजी ग्रामपंचायत सभागृहात एका दिवशी ३५० जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. यामध्ये ४५ वर्षावरील १५० जणांना व १८ ते ४४ वयोगटातील २०० जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आल्याची माहिती सरपंच रामदास पवार यांनी दिली.
वडगाव कांदळी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वडगाव कांदळी यांच्या माध्यमातून वडगाव कांदळी, कांदळी ग्रामपंचायत हद्दीतील ४५ वर्षावरील १६३५ ग्रामस्थांपैकी १४८० जणांना पहिला डोस व ११२० ग्रामस्थांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे. तर १८ ते ४४ वर्षाच्या वयोगटातील ३६० जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे. या लसीकरणासाठी पिंपळवंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल शिरसाठ, वडगाव कांदळी प्राथमिक उपकेंद्राचे एम .जी. निघोट, विजय शिंदे, आशावर्कर सुषमा भालेराव, रेखा कुतळ, संगीता कुतळ, सुनीता गुंजाळ, जोत्सना भोर, रोहिणी पवार गटप्रवर्तक दिपाली थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले.
जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी सरपंच रामदास पवार, उपसरपंच संजय खेडकर प्रा. श्रीकांत पाचपुते,ग्रामपंचायत सदस्य जिजाभाऊ भोर, पंढरीनाथ पाचपुते, ग्रामसेवक बी.एम. वाघे ,शरद फुलसुंदर, शोभा पाचपुते यांनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *