वस्तीगृहातील शंभर विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी
३० ऑगस्ट २०२२
जुन्नर
रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने रविवार दि.28 ऑगस्ट रोजी जुन्नर शहरातील श्री संत गाडगे बाबा वसतीगृहा मधील जवळपास शंभर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची आरोग्य तपासणी मोफत करण्यात आली.

रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचा उपक्रम
जुन्नर शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून थंडी, ताप, खोकला, सर्दी याचे रूग्ण वाढले असून डेंगू मलेरीयांसारखे आजार तोंड वर काढू पाहत आहे. रूग्णाची वाढती संख्या लक्षात घेता रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने जुन्नर शहरातील वसतीगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी उपक्रम हाती घेण्यात आला असून सदर उपक्रमात रोटेरीयन डाॅ.सागर शिंदे, डाॅ.अमोल पुंडे, डाॅ.सौ.पुंडे यांचे मोलाचे योगदान लाभले.
विद्यार्थांची आरोग्य तपासणी करून त्यांना त्यांच्या असलेल्या आरोग्य तक्रारी नुसार प्राथमिक स्वरूपात काही गोळ्या औषधे रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने मोफत देण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी चे अध्यक्ष अतुल परदेशी, सेक्रेटरी चेतन शहा, विनायक कर्पे, तुषार लाहोरकर, धनंजय चव्हाण, दत्ता म्हस्कर, प्रदिप चौधरी, हितेंद्र गांधी, श्री संत गाडगे बाबा वसतीगृह चे संचालक सुभाष चौधरी, अधिक्षक दिपक चौधरी व कर्मचारी उपस्थित होते.