विक्रांत पतसंस्थेकडून रोप वाटप कार्यक्रम संपन्न…माजी सैनिक आणि ज्येष्ठ नागरिकांचा विषेश सन्मान…

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
नारायणगाव येथील अग्रगण्य असलेल्या विक्रांत नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव स्वर्गीय सुनील वाव्हळ सर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आणि भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील माजी सैनिक आणि नारायणगांव तेथील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांना तसेच गुंजाळवाडी येथील विद्यार्थ्यांना केशर आंब्याची अडीचशे रोप वाटप कार्यक्रम करण्यात आला अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाजगे आणि सचिव निलेश गोरडे यांनी दिली.


स्वर्गीय सुनील वाव्हळ सर यांची कर्मभूमी गुंजाळवाडी आणि संस्था मुख्य कार्यालय नारायणगाव येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी माजी आमदार शरददादा सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके,अमित बेनके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर, सरपंच योगेश पाटे, सरपंच राजेंद्र मेहेर,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकास दरेकर, राजश्रीताई बोरकर ,संतोषनाना खैरे, गुंजाळवाडी च्या सरपंच रेश्मा वायकर, उपसरपंच माया डोंगरे, मुख्याध्यापक रंजना बोराडे रवींद्र वाघोले, हरिचंद्र नरसुडे,आनंद वाईकर,धनेश पडवळ,प्रभाकर महाराज फुलसुंदर,जंगल कोल्हे, अशोक गांधी,गणेश वाजगे, मेहबूब काझी,मातोश्री शकुंतला वाव्हळ,शरद दरेकर,ज्योती संते इत्यादी मान्यवर व विक्रांत संस्थेचे पदाधिकारी, सभासद नागरिक उपस्थित होते.


स्वर्गीय सुनील वाव्हळ सर हे तळमळीचे शिक्षक आणि निस्वार्थी समाजसेवक होते, एक शिक्षक म्हणून त्यांनी जुन्नर तालुक्यात शिक्षकांचे उभे केलेले संघटन वाखणण्याजोगे आहे. विक्रांत पतसंस्था उभारणीत त्यांचे योगदान अभूतपूर्व आहे, असे मनोगत माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी व्यक्त केले.
यावेळी अनिलतात्या मेहेर, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके,सत्यशिल शेरकर, सरपंच योगेश पाटे, महेंद्र गणपुले,अनिल दिवटे, डी.के.भुजबळ,उमेश अवचट यांचीही भाषणे झाली.
स्वर्गीय सुनील वाव्हळ सर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विक्रांत पतसंस्थेच्या वतीने चिपळून पूरग्रस्तांना चादर ,ब्लँकेट तसेच साड्यांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संचालक मुकेश वाजगे यांनी केले व आभार सचिव निलेश गोरडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *