कळंब येथील शुभांगी संजय भालेराव हीच चा बिबट्याच्या हल्ल्यावेळी पळताना विहिरीत पडून मृत्यू…

कळंब ता. आंबेगाव येथील शुभांगी संजय भालेराव वय वर्ष १९ हिचा सोमवार दिनांक १६ रोजी विहिरीत पडून मृत्यू झाला असल्याची दुःखद घटना घडली आहे. शुभांगी ही शेताकडे गेली असताना बिबट्याने हल्ला केल्याने किंवा, बिबट्याचा हो आवाजाच्या भीतीने ती विहिरीत पडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुभांगी हि सकाळपासून बराच वेळ घरी न आल्याने तिचा सर्वत्र शोध सुरु होता. त्यावेळी ती शेतातकडे गेली असावी असा अंदाज व्यक्त करत उसाच्या शेताकडे तिचा शोध घेत होते. त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता ती दिसली नाही मात्र विहिरीवरील काही झाडे वाकलेले दिसल्याने ती विहिरीत पडली असावी असा अंदाज घेऊन पाण्यात गळ टाकून पाहिले असता तिचा मृतदेह गळाला लागला. या ठिकाणी उसाचे क्षेत्र मोठे असल्याने व शेतीला खेटूनच वीहीर व खूप अडचण असल्याने या ठिकाणी बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे.चार पाच दिवसांपूर्वी या भागात बिबट्याने घोडी मारली होती त्यामुळे बिबट्याने हल्ला केल्याने किव्हा त्याच्या भीतीने तिचा विहिरीत पडून मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती कळताच वनविभागाचे टीम, मंचर पोलीस स्टेशन, ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मंचर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास मंचर पोलीस स्टेशन वनविभाग करत आहे.

याबाबत वन विभागाची संपर्क साधला असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी बिबट्या ने हल्ला केल्याचे दिसत नाही मात्र मयत शुभांगीच्या शरीरावर अनेक जखमा असून या जखमा नक्की बिबट्याने केल्या आहेत की नाही हे पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच कळेल त्यानंतरच नक्की काय घडले याबाबत सांगता येणे शक्य आहे.

कळंब ता. आंबेगाव येथे १९ वर्षीय मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाला
कळंब ता. आंबेगाव येथे १९ वर्षीय मुलीचा विहिरीत पडून मृत्यू झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *