खेड येथील पप्पू वाडेकर व मंचर येथील राण्या उर्फ ओमकार बाणखेले यांच्या खुनातील आरोपी पवन सुधीर थोरात याला अटक…

नारायणगाव : (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
आंबेगाव व खेड या दोन तालुक्यात गेल्या महिनाभरात दोन खून करणारा मुख्य आरोपी पवन सुधीर थोरात वय २२, याला गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने अटक केले.
राजगुरुनगर (ता.खेड) येथील पप्पू वाडेकर यांचा १२ जुलै २०२१ रोजी खेड येथे वर्चस्व वादातून खून झाला होता.

तसेच मंचर येथील कुख्यात गुंड ओमकार उर्फ राण्या बाणखेले याचा २ ऑगस्ट २०२१ रोजी आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे डोक्यात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यातील फरार आरोपी पवन सुधीर थोरात (वय २२, रा. जुना चांडोली रोड, मंचर, तालुका आंबेगाव जिल्हा पुणे) याला मंचर परिसरात येथील बसस्थानकावर संशयितांच्या करताना आढळल्याने त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्यांचे संपूर्ण नाव पवन सुधीर थोरात असे सांगितले. यापूर्वी त्याच्यावर विविध पोलिस स्टेशनमध्ये एकूण आठ गुन्हे दाखल आहेत.


दरम्यान ही यशस्वी कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री लंभाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस हवालदार दिपक साबळे, हनुमंत पासलकर, विक्रम तापकीर, राजू मोमीन, पोलीस नाईक संदीप वारे, पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले, दगडू वीरकर, पोलीस मित्र प्रसाद पिंगळे यांनी परिश्रम घेतले.

चौकट :
आरोपी पवन सुधीर थोरात याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये आठ गुन्हे दाखल असून मंचर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा रजीस्टर .नंबर ४५९/२०२१ नुसार भा.द.वि. कलम ३०२,१२० (ब), ३४ सह शस्त्र अधिनियम १५५९ चे कलम ३ (२५)(२७) असा दिनांक २/०८/२०२१ रोजी गुन्हा दाखल आहे. तसेच खेड पो.स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर.नंबर ३८५/२०२१ नुसार भा.द.वि. कलम ३०२,१४३,१४७,१४८,१४९,२०१ नुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. पवन थोरात याला अटक केल्यामुळे आणखी गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *