राजमाता जिजाऊ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गुणवत्ता यादीत सहावी….

पिंपरी-चिंचवड प्रतिनीधी
१० ऑगस्ट २०२२


राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय ,भोसरी ,पुणे 39 येथील बीबीए विभागातील विद्यार्थिनी कु .बागवान अलसुबा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 2021 मध्ये झालेल्या परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या दहामध्ये सहाव्या क्रमांकाची उत्तीर्ण झाली आहे . तिला एकूण 89 टक्के गुण प्राप्त झाले असून ,प्रथम दहा मध्ये येण्याचा बहुमान तिला मिळाला आहे.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास विठोबा लांडे,संस्थेचे सचिव सुधीर मुंगसे,विश्वस्त विक्रांत लांडे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक पाटील, उपप्राचार्य,सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक यांनी सदर विद्यार्थिनीचे कौतुक केले व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *