वडगाव गुप्ता येथे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती साजरी…

बातमी प्रतिनिधी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
वडगाव गुप्ता / नगर : दि. 02/08/2021

आण्णा भाऊ साठे नगर, वडगाव गुप्ता, ता. जिल्हा अहमदनगर येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची १०१ वी जयंती, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश समन्वयक नामदेव चांदणे, यांच्या नेतृत्वाखाली साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट हे होते. आल्हाट यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच, जील्हा उपाध्यक्ष संतोष जगताप यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. काँग्रेस कमिटीच्या वतीने मान्यवरांचा फेटा बांधून, हार व नारळ देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे, उपसरपंच बाबासाहेब गव्हाणे, दलित महासंघाचे जिल्हा संघटक निलेश चांदणे, बाळासाहेब चांदणे, नारायण शिंदे, संतोष नेटके, तेजस चांदणे, भैय्या चांदणे, प्रकाश नेटके, गणेश चांदणे, नवनाथ चांदणे, अण्णा शिंदे, एकनाथ फाजगे, दिपक शिंदे, राज साळवे, प्रेम साळवे, विलास मोहिते, मुसाभाई शेख, यश साळवे, सचिन साठे, बबलू गुडेकर, मुकुंद साठे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
अण्णा भाऊ साठे यांच्या शतकोत्तर पहिल्या जयंतीचा कार्यक्रम, हा भव्य दिव्य करण्याचे नियोजन होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केल्याची माहिती, काँग्रेस आय कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश समन्वयक, नामदेवराव चांदणे यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कला माहिती देताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *