१४ लाखांचा गुटखा वाहतूक करताना, शिरूर पोलिसांनी केला हस्तगत…

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिरूर : दि. ०२/०८/२०२१

    अवैधरीत्या गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती शिरूर पोलिसांना मिळाल्याने, शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने रविवार दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ते पहाटे पर्यंत केलेल्या कारवाईत, शासनाने बंदी घातलेला गुटखा व ते अवैधरीत्या वाहून नेणारे वाहन तसेच इतर साहित्य मिळून, सुमारे १४ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती, शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.
      ही कामगिरी पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या सूचनेनुसार,  पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पो. हवालदार मुकुंद कुडेकर, पो. कॉ. करणसिंग जारवाल, प्रविण पिठले यांच्या पथकाने रविवारी रात्री ते पहाटेच्या दरम्यान केली.
      या पथकाने, करडे-कारेगाव रोडवरील चौकात नाकाबंदी करीत सापळा रचत, रात्री साडेबाराच्या सुमारास पीक-अप गाडी नं. एम एच १४, एच यु ९८४३, ही संशयीतरीत्या  येत असताना दिसली. तेव्हा पोलीस पथकाने या पीक-अप वाहनास थांबण्याचा इशारा दिला असता, हे वाहन न थांबता गाडी पळून जात असल्याचे लक्षात येताच या पथकाने पीक-अपचा पाठलाग करून, थांबवून ते ताब्यात घेतले.
या पीक-अप वाहनामध्ये सुमारे ७,२०,०००/-रू किमतीचे २० पोती महक पान मसाला व १,८०,०००/- किंमतीचे जर्दा तंबाखु असा एकुण ९,००,०००/-रू चा गुटख्याचा माल मिळून आला. तसेच, हा गुटखा वाहून नेणारे पीक-अप वाहन, एमएच १४ एच यु ९४४३, किंमत रू. ५,००,०००/- रु असा एकुण १४,००,०००/- रु चा माल हस्तगत केला आहे. तसेच हा गुटखा वाहून नेणारा इसम नामे, मोहनसिंग रघुविरसिंग सेंगर, वय २८, रा. कुरखेडा, माधवगड, जि. जालौन, (उत्तर प्रदेश), सध्या रा. सणसवाडी ता. शिरूर, जि. पुणे याला अटक करण्यात आली आहे.
          तर या वाहनातील एक अनोळखी इसम पळुन गेला आहे. पोलीस कॉन्स्टेबल करणसिंग जारवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, या इसमाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पकडलेल्या आरोपीस मुदतीत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, शिरूर यांचे न्यायालयात हजर केले असता, त्यास न्यायालयाने दि. ४ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिला असल्याची माहिती, शिरुरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *