स्थायी समिती बैठकीत नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली ७२ कोटी ६६ लाखांच्या विविध विकासकामांना मंजुरी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१२ नोव्हेंबर २०२१ 

पिंपरी


ग क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर व्यवस्था, निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचे नुतनीकरण अशा विविध विकास कामांच्या सुमारे ७२ कोटी ६६ लाख रुपये खर्चास आज स्थायी समितीने मान्यता दिली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते. प्रभाग क्र ३ मध्ये पेव्हींग ब्लॉक बसविण्यासाठी १८ लाख रुपये, प्रभाग क्र. ५ मधील रस्त्यांची खडी मुरुम आणि बीबीएम पध्दतीने दुरुस्ती करण्यासाठी २७ लाख रुपये, पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी आवश्यक उपकरण खरेदीसाठी ४३ लाख रुपये, मैला शुध्दीकरण पंपींग स्टेशन मधील स्काडा प्रणालीचे चालन देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी ९४ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

प्रभाग क्र. ३२ मधील शिवाजी पार्क, कृष्णानगर परिसरात स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी १८ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.  तर प्रभाग क्र. ३ मध्ये किरकोळ दुरुस्तींच्या कामांकरीता १९ लाख रुपये खर्च होतील.  पिंपरीतील प्रभाग क्र. २१ मधील सुभाषनगर, संजय गांधीनगर आणि परिसरातील झोपडपट्टी भागात किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यासाठी ३४ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.  प्रभाग क्र. २३ मधील स्मशानभूमी आणि घाटाच्या नुतनीकरणासाठी ८३ लाख रुपये खर्च होणार आहेत.

ग क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय बहुउद्देशीय इमारतीमध्ये फर्निचर आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी ३ कोटी ८३ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.  निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचे नुतनीकरणासाठी ६४ लाख रुपये, प्रभाग क्र .२२ मधील ज्योतिबानगर येथील बाजीप्रभू चौक ते तापकीर मळा रस्त्यावरील विद्युत विषयक कामांसाठी ८२ लाख रुपये खर्च होणार आहेत.  या खर्चास स्थायी समितीने मंजूरी दिली. प्रभाग क्र. ७ मधील कबड्डी प्रशिक्षण केंद्रातील विद्युत विषयक कामांसाठी १ कोटी ४५ लाख रुपये, भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाईन प्रमाणे विकसित करण्यासाठी २ कोटी २६ लाख रुपये तसेच पिंपरीतील नवमहाराष्ट्र, पवनेश्वर आणि इतर मैदानावरील दिव्यांचे नुतनीकरण करण्यासाठी ९१ लाख रुपये खर्च होणार आहेत.  या खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *