स्वतःच्याच घरात गिऱ्हाईक बोलावून इतर महिलांकडून वेशा व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेस नारायणगाव पोलीसांनी घेतले ताब्यात…वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना पाठवले महिला सुधारगृहात…

(नारायणगाव :- किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
स्वतःच्या घरात वेश्या व्यवसायासाठी इतर महिलांना बोलावून घेऊन तसेच त्यांच्या मार्फत ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन गैरप्रकार करणाऱ्या महिलेस नारायणगाव पोलिसांनी तीन महिलांसह ताब्यात घेतले. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
संगीता संजय भोईटे ( वय ४७ वर्षे रा कोल्हेमळा रोड ग्रामीण रुग्णालय नारायणगाव समोर ता जुन्नर जि पुणे) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेचे नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि २८ जुलै रोजी नारायणगाव ग्रामीण रूग्णालया समोरील इमारती मध्ये आरोपी संगीता संजय भोईटे ही वेश्या व्यवसायासाठी इतर महिलांना बोलावुन घेऊन त्यांचे कडुन ओळखीचे लोकांकडुन पैसे घेऊन वेश्या व्यवसाय करत आहे अशी गोपणीय माहीती  साहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना मिळताच त्यांनी ही बाब उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या कानावर घातली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने आरोपी महिलेच्या घरावर छापा घातला असता तेथे तीन महीला आढळून आल्या. त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी सांगीतले की, आम्ही ओळखीच्या लोकांकडुन पैसे घेऊन वेश्या व्यवसाय करत असून मिळालेल्या पैशातून ठराविक रक्कम रूम मालकीणीला देत असल्याचे सांगितले.
यावरून संगीता भोईटे यांच्यावर अनैतीक व्यापार प्रतिबंधक कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणलेल्या महिलांना महिला सुधारगृह, मुंढवा, पुणे येथे पाठवण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख,अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पो.नाईक दिनेश साबळे . मेचकर, धनंजय पालवे, पो.काॅ. सचिन कोबल, शैलेश वाघमारे, होमगार्ड आकाश खंडे यांच्या पथकाने केली. गुन्हयाचा पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *