शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जुगलबंदी, बायपास चे आजी – माजी खासदारांनी केलं उद्घाटन..

राजगुरुनगर :प्रतिनिधी अक्षता कान्हुरकर

दिनांक 17/7/2021

अडीच किलोमीटर खेड घाट बायपास रस्ता चार किलोमीटर कसा झाला. कुणाची शाळा वाचविण्यासाठी रस्त्याचा मार्ग बदलला;चाकणची वाहतूक कोंडी पंधरा वर्षांत का सोडविली नाही या सर्व कामांचे श्रेय आढळराव यांनी घ्यावे.खासदार डॉ. अमोल कोल्हे.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याचे उद्घाटन व लोकार्पण आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाले.त्यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे बोलत होते.
यावेळी खासदार कोल्हे पुढे बोलताना म्हणाले की

अनुभवी माणसांनी वैयक्तीक पोरकटपणा करणे त्यांना शोभत नाही. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मी माजी खासदार शिवाजी आढळराव यांना फोन करणार होतो.फोन हातात घेतला आणि त्यांनी रस्त्याचे उद्घाटन केल्याचे फोटो पाहिले.
अडीच किलोमीटरचा खेड घाट बायपास रस्ता ४ किलोमीटर कसा झाला;याचे ही श्रेय आढळराव यांनी घ्यावे.
कुणाची शाळा वाचवण्यासाठी त्यांनी रस्ता मार्ग का बदलला हे ही त्यांनी सांगावे. या कामाची मंजुरी डिसेंबर २०१९ ची आहे.काम होणारच असते.जो लोकप्रतिनिधी त्याचे श्रेय घेतो तो धंद्यात खोटे बोलतो. १५ वर्षांपासून
चाकणची वाहतूक कोंडी का सोडवली नाही.याचे श्रेय त्यांनी घ्यावे,खेडचे विमानतळ कुणामुळे गेलं अशी टीका खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर केली.
माजी खासदार आढळराव यांनी काल खेड घाट बायपास व नारायणगाव बायपास रस्त्याचे उद्घाटन केले होते.
सुरेश कलमाडी यांच्या कार्यकाळापासून पुणे-नाशिक रेल्वे चा पाठपुरावा सुरू होता.२०१८ मध्ये रेल्वेचा डीपीआर तयार होता.२०१८ साली यांचे सरकार असताना त्यावर साधी चर्चा देखील झाली नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यावर
त्यांना हा मार्ग कसा फायदेशीर आहे. हे सांगितल्यानंतर त्यांनी पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचा डीपीआर पहिला आणि पुणे ते नाशिक दरम्यान असणाऱ्या सर्व आमदारांची बैठक घेऊन,सर्व अडचणी समजून घेऊन त्याला मंजुरी दिली.राज्यात महाविकास आघाडी असून
शिरूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी नाही.खासदार संजय राऊत यांना देखिल चुकीची माहिती दिली गेली. मी खासदार होत असताना दिलीप मोहिते पाटील व अशोक पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यावर हे नेहमी टीका करतात. बैलाचा समावेश जंगली प्राण्यांच्या यादीत होता.१५वर्ष खासदार असताना त्यांनी बैलाचा समावेश पाळीव प्राण्यात का केला नाही.मी खासदार झाल्यावर बैलाचा समावेश जंगली प्राण्यांमधून पाळीव प्राण्यामध्ये केला.

खेड घाटाच्या पायथ्याशी झालेल्या या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक ग्रामस्थ व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. या कामाचे खरे श्रेय हे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे आहे. मी फक्त कर्तव्य म्हणून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी व आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे खेडघाटाचे लोकार्पण या शेतकऱ्यांच्या हस्ते करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यानुसार दत्तात्रय कोरडे, देवराम थिगळे, दशरथ थिगळे, तुकाईवाडीच्या सरपंच कुसुम भांबुरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला.

आमदार दिलीप मोहिते पाटील बोलताना म्हणाले की

डॉ. अमोल कोल्हे हे खासदार झाल्यानंतर बायपास रस्त्यांची ही कामे सुरू झाली. मी आमदार असताना टोकावडे आश्रमशाळा,कोहिंडे खुर्द येथिल आश्रम शाळा, आळंदी ग्रामीण रुग्णालय या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आणिफ उद्घाटन माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे, माजी खासदार आढळराव यांनी केले. त्यावेळेला त्यांनी माझे नाव टाकण्याचे सौजन्य देखील दाखवले नाही.मी त्यांच्या अगोदर या कामांचे उद्घाटन करू शकलो असतो पण असे करून मला काय मिळणार होते.काल माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील नौटंकी करून खेड घाट बायपास रस्त्याचे उद्घाटन केले.उद्घाटन करण्यासाठी त्यांनी कुणाची परवानगी घेतली; कोणी दिली. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची परवानगी घेतली होती का?
त्यांनी कोणाची परवानगी घेतली नाही. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे ठराव केले त्याला आम्ही सहमती दिली. ज्या ठिकाणी आमदार खासदार राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या पक्षांचे आहेत त्या ठिकाणी त्या जागा त्या पक्षाला सुटणार आहेत. मग आढळराव हा विरोध कशासाठी करतात. खेड तालुक्यात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी
२२ कोटी रुपये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. अजित पवार हे खेड येथे आले असता त्यांनी पंचायत समितीची इमारत पहिली आणि जुने कॉर्टर पडून नवीन इमारत बांधावी असे त्यांनी सांगितले. पंचायत समिती ला नवीन इमारतिची आवश्यकता नाही. पंचायत समितीला माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांचे नाव दिल्यास माझी कोणतीही अडचण नाही.
राम गावडे,गणेश सांडभोर, अमृता गुरव हे त्यांना का सोडून गेले.ह्यांनी कामे केली नाहीत त्यामुळे ही माणसे त्यांना सोडून गेली. शिरूर येथे अशोक पवार यांना त्यांनी घरात घुसून मारण्याची धमकी दिली. गुंडगिरी करून लोकांना धमकी देणे. हे आढळरावांचे काम आहे.त्यांच्या खेड येथिल सहकाऱ्यांबद्दल न बोललेलंच बर!.पोलिस संरक्षण काढल्यास आढळरावना कोणी रामराम देखील घालणार नाही.
राहुल गांधीयांचे देखील पोलीस संरक्षण काढले आहे. मग यांना संरक्षण का?
संपूर्ण रस्त्याला रिटनिंग ऑल टाकावा. या ठिकाणी अपघात होतात या ठिकाणी सर्कल करावे.सिग्नल यंत्रणा बसवावी. त्यामुळे अपघात टाळता येतील.मुख्यमंत्री शिवसेनेचा असून आढळराव यांनी खेड शिरूर आंबेगाव या तालुक्यांसाठी कित्ती निधी आणला किती वेळा ते मुख्यमंत्री यांना भेटले हे त्यांनी सांगावे.
आढळराव हे आंबेगाव तालुक्यातील कामांना अजिबात विरोध करत नसून
विरोध फक्त खेड तालुक्यातील कामांना करतात.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे,तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, दिलीप मेदगे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, सभापती विनायक घुमटकर,पुणे जिल्हा बँकेचे संचालक संजय काळे, माजी सभापती अरुण चांभारे,रामदास ठाकूर,विलास कातोरे, बाळशेठ ठाकूर, चंद्रकांत इंगवले, नवनाथ होले, दिलीप मेदगे,
महिला तालुकाध्यक्ष संध्या जाधव, पुणे जिल्हा उपाध्यक्षा कांचन ढमाले,युवती अध्यक्ष आशा तांबे, युवक अध्यक्ष कैलास लिंभोरे, युवक जिल्हाध्यक्ष अरुण थिगळे, धैर्यशील पानसरे, मनीषा सांडभोर, मनीषा टाकळकर,अजय भागवत, सुभाष होले,विशाल नायकवडी, अमोल पानमंद,मयूर मोहिते, उमेश गाडे,महेंद्र काळे,किरण पवार, विलास मोहिते,रवींद्र गाढवे व अन्य पदाधिकारी, तुकाईवाडी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *