तृतीयपंथीयांना मिळणार महाराष्ट्रातील पाहिले स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृह

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि ९ सप्टेंबर २०२१

समाजात आज सर्व समान आहेत पण सर्वाना समान सुखसुविधा मिळत नाहीत. समाजातील तृतीयपंथीय हा घटक अनेक बाबतीत असाच उपेक्षित राहिलेला आहे.
आजवर समाजात कोठेही दिसणारे तृतीयपंथीय हा बर्‍याच अंशी एक कुतुहल, थट्टा, किळस अश्या भावनांचे मिश्रण असलेला विषय असल्याचा प्रभाव सर्वत्र पसरल्याचे चित्र दिसत असे. तृतीयपंथियांना सर्वोच्च न्यायलयाने एक ‘कायदेशीर अस्तित्व’ बहाल केलेले आहे. समाजात समान हक्काने जगता यावे अशी मागणी तृतीयपंथीयांकडून कायम केली जाते. शहरात अनेक ठिकाणी पुरुष आणि महिलांना स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत.त्याचप्रमाणे तृतीयपंथीयांनाही स्वतंत्र स्वच्छतागृह असावे अशी मागणी काल राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहरातर्फे करण्यात आली. याचे निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना देण्यात आले. यावेळी आयुक्तांनीही यावर योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

यावेळी राष्ट्रवादी तृतीयपंथीय पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा किरणताई वाघ ,राष्ट्रवादी सामाजिक न्याय महिला शहर अध्यक्षा गंगाताई धेंडे , राष्ट्रवादी महिला बचत महासंघाच्या अध्यक्षा कविताताई खराडे , तृतीयपंथीय सेल सदस्य किरणताई राऊत आणि राष्ट्रवादी अर्बन सेलचे शहर अध्यक्ष माधव पाटील उपस्तिथ होते.
आता महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांसाठी पहिले स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृह पिंपरी चिंचवड शहरात उभे राहील की नाही हा औत्स्युक्याचा विषय बनला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *