माजी सरपंचांनी माझ्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे व खोटे असून, माझ्या कुटुंबियांची नाहक बदनामी करत असतील तर मी अब्रुनुकसानीचा दावा का ठोकू नये – संदीप नवले, ग्रा. पं. सदस्य, कारेगाव

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
कारेगाव : 03/07/2021.

       शिरूर तालुक्यातील कारेगाव ग्राम पंचायत हद्दीतील, सरकारी गायरान जमिनीचा गैरव्यवहार करून काहींनी सरकारची व लोकांची फसवणूक केल्याचा आरोप, कारेगावचे माजी सरपंच व भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष, अनिल नवले यांनी परवा पत्रकार पतिषदेत केलेला होता.
त्यामुळे, कारेगावचे राजकारण आता पुन्हा ढवळून निघण्याची चिन्हे आहेत.


परंतु माजी सरपंच अनिल नवले यांनी, परंतु त्यांनी नाव न घेता ज्यांच्यावर हे आरोप केले आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेत, या सर्व आरोपांचे खंडन केले आहे.
    माजी सरपंच अनिल नवले यांनी ज्या गट नं चा उल्लेख केला होता, त्याचे मालक व हक्कदार व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य संदीप नवले यांनी पुढे येत यावर पत्रकार परिषद घेत,   त्यावर खुलासा करत हे सर्व आरोप फेटाळले असून, अनिल नवले यांच्यावर आगपाखड केलीय. तसेच अनिल नवले हे माझी व माझ्या कुटुंबियांची विनाकारण बदनामी करत असल्याने, त्यांच्यावर मी अब्रुनुकसानीचा दावा का ठोकू नये ? असाही प्रतिप्रश्न विचारलाय.

       संदीप नवले यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, माजी सरपंच अनिल नवले यांचा ग्राम पंचायत निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळेच, ते सध्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतून आमच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत.
        आम्ही आमची खाजगी जमीन विकली असून, कारेगाव (ता. शिरुर) येथील गट क्र. ६९८ मधील खाजगी जमीन विकुन त्याचा ताबा सरकारी गायरान जमीन गट क्र. ७०९ मध्ये दिला जात असल्याचा माजी सरपंच अनिल नवले यांचा आरोप, हा पूर्णपणे चुकीचा व बिनबुडाचा असून, गट क्र. ६९८ हा माझ्या कुटुंबियांच्या नावे असून सदर गटामधील काही क्षेत्र माझ्या कुटुंबीयांनी विक्री करताना त्याचा ताबा वेळोवेळी मोजणी करुनच दिलेला आहे. त्यामुळे अनिल नवले यांनी माझ्या कुटुंबीयांची बदनामी थांबवावी. तसेच माझ्या कुटुंबियांना विनाकारण या प्रकरणात ओढु नये. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनिल नवले, हे ज्या वार्डमध्ये निवडणुकीसाठी उभे होते, त्यामध्ये गट क्र. ७०९ हा येतो. त्या गटामध्ये अनुसुचित जाती – जमातीच्या लोकांचे मतदान आहे. तसेच त्या लोकांचे या गटात वास्तव्य आहे. अनिल नवले यांचा या वार्ड मध्ये दारुण पराभव झालाय. त्याचाच राग मनात धरुन अनिल नवले राजकीय द्वेषातुन, हे भंपकपणाचे आरोप करत आहेत. तसेच निवडणुकीत पराभव झाल्याने अनुसुचित जाती – जमातींच्या लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
       गायरान जमीन गट क्र. ७०९ मध्ये, अनिल नवले यांनी शासकीय आरोग्य उपकेंद्रासाठी जागा मिळावी अशी मागणी केली होती. यावर उत्तर देताना संदीप नवले म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री आणि शिरुर आंबेगाव विधान सभा मतदार संघाचे आमदार दिलीप वळसे (पाटील) यांच्या प्रयत्नातुन, कारेगाव उपकेंद्रासाठी दिड कोटींचा निधी मंजुर झाला असुन, आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतने जागेचीही व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे गट क्र. ७०९ मध्ये असलेल्या गोरगरीब जनतेची घरे पाडुन, अनिल नवले काय साध्य करु इच्छितात हेच आम्हाला समजत नाही.
सध्या त्यांनी सुरू केलेले राजकारण हे सुडाचे असून, गोरगरीब जनातेच्या मागे लागू नका असे म्हणत संदीप नवले यांनी कोपरापासून हात जोडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *