बेल्ह्यातला तो धोकादायक खड्डा सरपंच गोरक्षनाथ वाघ यांनी बुजवला…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.3/7/2021

बेल्ह्यातला तो धोकादायक खड्डा सरपंच गोरक्षनाथ वाघ यांनी बुजवला

बातमी:-विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

बेल्हे:- बेल्हे बायपास ते बसस्थानक रोडवरील शरद बँकेजवळ असणारा धोकादायक खड्डा अखेर सरपंच गोरक्षनाथ वाघ यांनी बुजवला. शुक्रवार (दि. २) रोजी या खड्यात एका दुचाकीचा अपघात होऊन महिलेला गंभीर दुखापत झाली होती.

सदर घटनेची तात्काळ दखल घेत शनिवार दि. ३ रोजी
गावचे युवा सरपंच गोरक्षनाथ वाघ यांनी स्वतः उभे राहून तत्परतेने सिमेंट काँक्रीट करून हा खड्डा बुजून घेतला. या खड्ड्यांमध्ये तीन वर्षांपूर्वी एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाला होता. जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना या खड्ड्यांचा रोज सामना करावा लागत होता. हा खड्डा बुजवला ने परिसरात सरपंचाच्या या तत्परतेचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *