आदर्शगाव गावडेवाडी मध्ये कोरोणा प्रतिबंधक लसीकरण मोहीम शिस्तबद्ध पार पाडत 240 व्यक्तीनी घेतला लाभ…

   अवसरी : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
गावडेवाडी ता.आंबेगाव येथे 18 वर्षा पुढील 240 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण  मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये येथे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना पहिला व 45 वर्षापुढील नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.

लसीकरणासाठी  नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे सरपंच स्वरूपा गावडे व उप सरपंच मंगल गावडे  यांनी सांगितले यावेळी लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी  रेश्मा शिंदे तसेच विक्रम काळे यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका ज्योती गायकवाड ,आरोग्य सेवक अविनाश सुरूशे ,आरोग्य साहयक भगवान सिंग परदेशी ,आशा वर्कर अर्चना गावडे मदतनीस राजेश्री डोंगरे   ,यांनी  हे लसीकरण अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडले यावेळी ग्रामसेवक दिपाली थोरात ,ग्रामपंचायत सदस्य विजय गावडे ,विनायक गावडे ,राजेंद्र गावडे ,लक्ष्मण गावडे , सनेहल गावडे ,योगिता गावडे ,एकनाथ गावडे,मंदा लहू गावडे ,प्रियांका गावडे , तसेच तंटामुक्ती अध्यक्ष देवराम गावडे यांचे  देखील मोलाचे  सहकार्य मिळाले या आजच्या लसीकरणात दुसरा डोस घेणाऱ्याची संख्या 190 असल्याचे दिसून आले तर पहिला डोस घेणाऱ्याची संख्या 50 होती  लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित झाले होते. मुख्य म्हणजे आज लसीकरण केंद्रावर मात्र मोठी गर्दी असतांना देखील शासकीय नियमांचे काटेकोर पणे पालन करून नागरिकांनी प्रतिसाद दिला.

लवकर पुन्हा अशा प्रकारे लसीकरण गावामध्ये घेऊन कोरोणाच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी शंभर टक्के लसीकरण करून कोरोणा मुक्त गाव करू असे देखील यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय गावडे ,अशोक डोंगरे ,व हनुमंत गावडे यांनी यावेळी सांगितले .विशेष म्हणजे या गावाचा आदर्श घेऊन इतर गावांनी देखील शिस्तबद्ध मोहिम शासकीय नियमांचे पालन करावे असे देखील यावेळी सामाजिक कार्यकर्ते मच्छिद्र रामदास गावडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *