अहमदनगर महानगरपालीकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे व उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड…

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
अहमदनगर : दि. 29/06/2021.

अहमदनगर महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत, शिवसेनेच्या रोहिणी संजय शेंडगे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याने, शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण होते.

तर, उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड झालीय.
या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात, कुणीही उमेदवारी अर्ज भरले नव्हते. त्यामुळे उद्या बुधवार दि. 30 जून 2021 रोजी, या दोन्ही पदांसाठी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत, रोहिणी शेंडगे व गणेश भोसले यांच्या नावाच्या अधिकृत घोषणेची, केवळ औपचारिकताच बाकी आहे.


अहमदनगर महानगर पालिकेच्या महापौरपदासाठीचा अर्ज, शिवसेनेच्या वतीने नगरसेविका रोहिणी संजय शेंडगे यांनी, पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत, सोमवारी दि. 28 जून 2021 रोजी दाखल केला होता.
त्यानंतर उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी, मंगळवार दि. 29 जून 2021 रोजी महाविकास आघाडीच्या वतीने, नगरसेवक गणेश भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान महापौर व उपमहापौर पदाकरीता, प्रत्येकी एक – एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे, महानगरपालिकेची ही निवडणुक बिनविरोध झाल्याचे चित्र स्पष्ट आहे. उद्या बुधवार दि. 30 जून 2021 रोजी केवळ याबाबतची अधिकृत घोषणा करणेच बाकी आहे.

अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच महापौर व उपमहापौर पदाची निवडणुक ही बिनविरोध होत असल्याने, एक इतिहास निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
याआधी, 2012 साली शिवसेनेच्या उमेदवार शीला शिंदे यांच्या विरोधात, काँग्रेसच्या सुवर्णा कोतकर यांनी दाखल केलेला अर्ज, प्रत्यक्ष मतदानाआधीच मागे घेतल्याने, शीला शिंदे या बिनविरोध महापौर म्हणून निवडून आल्या होत्या.
तर 2016 मध्ये, सेनेच्या सुरेखा कदम यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या भाजप उमेदवार नंदा साठे, यांनी त्यावेळी माघार घेतल्याने, सुरेखा कदम या बिनविरोध महापौर झाल्या होत्या.
परंतु यंदा म्हणजेच 2021 मध्ये, महापौर पदासाठी विरोधकांचे अर्जच न आल्याने, शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमहापौर म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत.
निवडणूक कार्यक्रम प्रक्रियेनुसार, या निवडींची केवळ अधिकृत घोषणाच बाकी असून, ती उद्या बुधवार दि. 30 जून रोजी होऊन, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

Advertise


उपमहापौर पदाचे उमेदवार व नगरसेवक गणेश भोसले यांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माणिक विधाते, विनीत पाऊलबुद्धे, माजी नगरसेवक संजय शेंडगे, संजय चोपडा, सुभाष लोंढे, दत्ता कावरे, नगरसेवक गणेश कवडे, कुमार वाकळे, अजिंक्य बोरकर, श्याम नळकांडे, जहागीरदार, सागर बोरुडे, सुनील त्र्यंबके, दीपक सूळ, बाळासाहेब पवार, धनंजय जाधव निखिल वारे, फारूक शेख, उबेद शेख, प्रशांत गायकवाड, सचिन जाधव, मुदासर शेख, प्रकाश भागानगरे, चैतन गुंदेचा, समद खान, जॉन लोखंडे, आदी उपस्थित होते.
अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, शिवसेनेने महापौर पदासाठी रोहिणी शेंडगे यांचा उमेदवारी अर्ज काल दाखल केलेला होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपमहापौर पदासाठी गणेश भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. स्थानिक पातळीवर सर्वांनी आम्हाला साथ दिली. त्यामुळेच आता ही निवडणूक बिनविरोध झाली असून, राज्यामध्येही आगामी काळात, महाविकास आघाडी अशाच पद्धतीने निवडणूक लढणार असल्याचे काकडे यांनी सांगितले. महाविकास आघाडीची सत्ता महापालिकेत स्थापन झाल्यामुळे, आता राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामांसाठी भरीव असे योगदान मिळेल. त्यासाठी स्थानिक पातळीवर आमदार व लोकप्रतिनिधी, निश्चितपणे मदत करतील असेही ते यावेळी म्हणाले.

नगरमध्ये भारतीय जनता पार्टीने, विरोधासाठी विरोध न करता, एक प्रकारे समजदारी दाखविल्याचेही यावेळी अंकुश काकडे म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर, स्थानीक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्रित निवडणूका लढविण्याचा निर्णय, या आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला होता. त्यानुसारच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या निवडणुका पार पाडत असल्याचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.
उपमहापौर पदाची गळ्यात माळ पडणारे गणेश भोसले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महा विकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी देण्यात आलेली आहे. मला शिवसेनेसह सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी साथ दिली. त्यामुळेच, ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली असून, गेल्या अनेक ववर्षांपासून मी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत होतो. आता उपमहापौर पदाच्या माध्यमातून, नगर शहरातील विकासाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, ते सोडवले जाणार असल्याचेही ते म्हणाले. नगर शहर हरित नगर करण्याचा, तसेच शहरात वृक्ष गणना करण्यास प्राधान्य देणार असून, पाणी, स्वछता व पथदिवे हे प्रश्न प्राधान्याने सोडविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगर शहरात अमृत गटार योजनेच्या खोदकामामुळे रस्त्यावर खड्डे झाले असल्याने, हे काम दोन महिने म्हणजे पावसाळा संपेपर्यंत बंद ठेवण्याची भूमिका, पक्ष श्रेष्ठीनकडे बैठकीत मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापौर पदाची माळ ज्यांच्या गळ्यात पडणार आहे त्या रोहिणी शेंडगे यांनी यावेळी सांगितले की, माझे पती, मी व आमचे कुटुंब, शिवसेना पक्ष व पक्षाच्या सर्व नेत्यांशी, अगदी पहिल्यापासूनच एकनिष्ठ राहिल्यामुळे आम्हाला हा बहुमान मिळाला आहे. जनतेची सेवा व नगरचा विकास एवढेच धेय्य आता आमच्या समोर असून, सर्वांच्या सहकार्याने पुढे काम करिन.

तर, माजी नगरसेवक व शिवसेनेचे नगर शहरातील जेष्ठ नेते संजय शेंडगे यांनी सांगितले की, आज मला व आम्हा सर्वांना नगरचे दिवंगत आमदार अनिलभैय्या राठोड यांची आठवण प्रकर्षाने येत आहे. त्यांनीच मला नगर शहरातून संधी दिली. तसेच प्रा. शशिकांत गाडे सरांचे मार्गदर्शन नेहमीच लाभत असून, आमचे महापौर पद हे शिवसेनेमुळेच असल्याने, मला एक कट्टर शिवसैनिक असल्याचा अभिमान वाटतोय.

 "मी बाळासाहेब ठाकरे यांचा एक सच्च्या कार्यकर्ता होतो व राहीलो. त्यामुळेच आमच्यावर ही जबाबदारी पक्षाने व श्रेष्ठीन्नी दिली याचा खूप आनंद वाटतोय. तसेच, आमच्या सर्व शिवसैनिकांचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, जेष्ठ मंत्री एकनाथ शिंदे, दादासाहेब भुसे, शंकरराव गडाख व महाविकास आघाडीतील अनेक मंत्री महोदयांचा आशीर्वाद आम्हाला यावेळी मिळाला.

मी या सर्वांचेच, मनापासून आभार मानतो. तसेच, माजी महापौर भगवान फुलसुंदर, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, दिलीप सातपुते, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे व नगर मधील तळागाळातील सर्वच शिवसैनिक, कार्यकर्ते, मित्र व नातेवाईकांनी आत्तापर्यंत खूप मोलाची मदत केलीय, या सर्वांचेच चांगले सहकार्य लाभले असून सर्वांचेच मी आभार मानत असल्याचे”, संजय शेंडगे यांनी यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना आवर्जून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *